कविताने तिघांवर अशी जादू केली की, अखेर एकाला संपवावं लागलं, जर तुला वाटत असेल की आपण…
असं म्हणतात, प्रेम कितीही लपवलं, तरी ते लपून राहत नाही. "जो पर्यंत हा जिवंत राहील, आपण दोघे भेटू शकत नाही. जर तुला वाटत असेल की आपण भेटावं, तर आजच याला मार्गातून बाजूला कर" कविताचे हे शब्द ऐकून गुलजार घरातून शस्त्र घेऊन निघाला.

अनैतिक संबंधांचा शेवट कधीही चांगला होत नाही. असं म्हणतात, प्रेम कितीही लपवलं, तरी ते लपून राहत नाही. पतीला पत्नीच्या अफेअरबद्दल समजलं. पण तरीही त्याने मोठ मन दाखवून माफ केलं. पत्नीने पुन्हा फसवणूक करु नये, म्हणून तिच्यासोबत थोडी कठोरता दाखवली. पती नेहमी तिच्यावर नजर ठेऊ लागला. बायकोसोबत असं वागणं महाग पडेल, याचा नवऱ्याला अंदाज आला नाही. पत्नीला नवऱ्याचं असं वागणं आवडत नव्हतं. नवऱ्याच्या कठोरतेमुळे तिला तिच्या प्रियकरांना भेटता येत नव्हतं.
म्हणून पत्नीने प्रियकराच्या साथीने नवऱ्यालाच संपवून टाकलं. शुक्रवारी पोलिसांनी मृतकाची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली वस्तू, रक्ताने माखलेलं टी-शर्ट, मोबाइलसह काही महत्त्वाचे पुरावे गोळा केलेत. पतीच्या हत्येशिवाय पोलिसांना महिलेचे असं कांड समजले ते ऐकून पोलीसही हैराण झाले.
हा जिवंत राहीला तर आपण दोघे भेटू शकणार नाही
उत्तर प्रदेश मथुरा येथील कोसीकला गावच हे धक्कादायक प्रकरण आहे. 27 वर्षीय गोविंद घरातून दारुच्या नशेत निघाला होता. गोविंदची पत्नी कविताने बॉयफ्रेंज गुलजारला याची माहिती दिली. गोविंद दारुच्या नशेत असल्याच कविताने सांगितलं. “जो पर्यंत हा जिवंत राहील, आपण दोघे भेटू शकत नाही. जर तुला वाटत असेल की आपण भेटावं, तर आजच याला मार्गातून बाजूला कर” त्यानंतर गुलजार घरातून शस्त्र घेऊन निघाला.
जीव वाचवण्यासाठी गुलजारसोबत झटापट
निर्जन स्थळी त्याने गोविंदवर वार करुन त्याची हत्या केली. गुलजारने गोविंदच्या गळ्यावर अनेक वार केले. गोविंद रक्तबंबाळ झाला. मरण्याआधी जीव वाचवण्यासाठी त्याची गुलजारसोबत झटापटही झाली. पण त्याला आपले प्राण वाचवता आले नाहीत.
दीरासोबतही अनैतिक संबंध
पोलीस चौकशीत समोर आलय की, मृतक गोविंदची पत्नी कविताचे गावातील गुंजार ऊर्फ गुलजारशी अनैतिक संबंध होते. नात्यात जो दीर लागतो, त्याच्यासोबतही कविताचे संबंध होते. याच दीराने तिला मोबाइल फोन दिलेला. त्यावरुन ती गुलजारशी बोलायची. त्याआधी 2020 पर्यंत बरसाना येथे राहणाऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध होते. गोविंदला या बद्दल समजल्यानंतर घरात खूप भांडणं झाली. पोलीस ठाण्यापर्यंत विषय गेला. कविताने माफी मागितल्यानंतर विषय संपला. गुलजारबद्दल समजल्यानंतरही पतीने तिला माफ केलं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.