महिलेच्या बाहेरील व्यक्तीसोबत अफेरची गावाला होती माहिती, त्या रात्री तो आला आणि झालं असं की…

आईचे 55 वर्षीय व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी मुलांनी आईला प्रियकरासोबत नको त्या स्थितीत पाहिलं आणि रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं.

महिलेच्या बाहेरील व्यक्तीसोबत अफेरची गावाला होती माहिती, त्या रात्री तो आला आणि झालं असं की...
मुलं बाजूच्या खोलीत झोपली होती, तेवढ्यात आवाज झाला आणि...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 20, 2023 | 6:04 PM
मुंबई : अनैतिक संबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे आता काही नवीन राहिले नाहीत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये घडला आहे. आईला एका व्यक्तीसोबत विचित्र अवस्थेत पाहिल्यानंतर मुलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच काय तर आईच्या प्रियकराला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतला. ही घटना विजयगड ठाण्यातील एका गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
महिलेचे 55 वर्षीय राम खिलाडीसोबत अनैतिक संबंध होते. आईला तशा अवस्थेत तीन मुलांनी पाहिलं होतं. त्यानंतर  त्याची हत्या करून त्याचा मृतदेह घरात लपवून ठेवला. मात्र गावातील एक मुलगा घरी आल्यावर हा प्रकार समोर आलं.  पोलिसांना राम खिलाडीचा मृतदेह त्याच्याच घरात आढळून आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस सदर महिलेच्या घरी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तपास सुरु केला आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच घटनेचा पंचनामा देखील केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे महिलेसोबत अनैतिक संबंध होते. महिलेच्या मुलांनी घटनेच्या दिवशी तिला नको त्या स्थितीत पाहिलं. त्यानंतर रागाच्या भरात मुलांनी आईच्या प्रियकराची हत्या केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “राम खिलाडी महिलेसोबत दुसऱ्या खोलीत झोपला होता. तेव्हा मुलं झोपेतून जागी झाली आणि त्यांनी आई आणि राम खिलाडीला तशा अवस्थेत पाहिलं.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या कुटुंबाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.