AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा मृत्यू

Crime News: नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले तिघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नदीत दुर्घटना घडल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तिघांच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरु केले. नदीच्या डोहातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा मृत्यू
वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 26, 2025 | 8:04 AM
Share

Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील खडपोली रामवाडी येथे दुर्देवी घटना घडली. वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. आठ वर्षीय लक्ष्मण कदम नदीच्या डोहात आंघोळ करत होता. त्यावेळी तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई लता कदम आणि आत्या रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु या घटनेत तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाशिष्ठी नदीचा डोह १२ ते १४ फूट खोल आहे. या ठिकाणी नदीचे पाणी वाहत असते.

चिपळूण येथील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीत लता कदम आणि रेणुका शिंदे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत लता कदम यांचा आठ वर्षांचा मुलगाही होता. दोन्ही महिला कपडे धुत असताना लक्ष्मण आंघोळ करण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी तो बुडू लागला. लता कदम यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु हे दोघे बुडू लागले. हा प्रकार रेणुका शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनीही पाण्यात उडी घेतली. परंतु त्या डोहात तिघांचा बुडून मृत्यू झाला.

नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेले तिघे घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरु झाला. त्यावेळी नदीत दुर्घटना घडल्याचे कुटुंबीयांना लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्या तिघांच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरु केले. नदीच्या डोहातून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यापूर्वीच तिघांचे मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात यश आले होते. या प्रकरणाची नोंद शिरगाव पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर खडपोली रामवाडी गावात शोककळा पसरली. मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....