AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशाचा पाऊस पाडून 80 कोटी, आमिषाला महिला भुलली, मांत्रिकाकडून मुलीचा शारीरिक छळ

पीडितेच्या आई आणि नातलगाच्या मदतीने दोघांनी अघोरी कृत्य करत वर्षभरापासून पीडितेचे शोषण केलं.. (Wardha Crime Black Magic Superstition)

पैशाचा पाऊस पाडून 80 कोटी, आमिषाला महिला भुलली, मांत्रिकाकडून मुलीचा शारीरिक छळ
पैशाचा पाऊस प्रकरणातील आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 3:13 PM

वर्धा : पैशाच्या लोभातून अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडतात. वर्धा जिल्ह्यातही पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करत गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. 80 कोटी रुपयांच्या आमिषाला पीडितेची आई बळी पडली आणि लेकीसोबत मांत्रिकाला घृणास्पद प्रकार करु दिल्याचा आरोप आहे. सातत्याने होणाऱ्या या छळाला कंटाळून पीडिता घरातून निघून गेली. यामध्ये पीडित युवतीच्या आईनेही अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं पुढे आलं आहे. मागील काही महिन्यांपासून सुरु असलेला हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करत बाळू मंगरुटकर आणि पीडितेचा काका अशा दोघांना अटक केली. (Wardha Crime Girl Physical Assault Black Magic Superstition)

पैशाचा पाऊस पडण्याची अंधश्रद्धा आजही समाजात कायम असल्याचं पाहायला मिळतं. वर्धा जिल्ह्यात पैशाचा पाऊस पडत असल्याच्या नावाखाली युवतीचा छळ केला गेला. अघोरी पूजा करून लाख-दोन लाख नव्हे, तर तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाकडून केला गेला. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार करण्यात आले.

कशी झाली सुरुवात?

पीडित युवतीची आई एका दुकानात काम करायची. तिथं ओळख झालेल्या महिलेने मुलीची पूजा करुन पैशाचा पाऊस पाडणारा एक मांत्रिक आपल्या ओळखीत असल्याचं सांगितलं, तिथून या छळाला सुरुवात झाली. युवतीला वर्ध्यासोबतच लगतच्या जिल्ह्यांतही नेण्यात आलं होतं. युवतीच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष मांत्रिकाकडून दाखवण्यात आलं.

जादूटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडण्याच्या थापा ढोंगी बाबाने मारल्या. त्यामुळे पीडितेच्या आई आणि नातलगाच्या मदतीने दोघांनी अघोरी कृत्य करत वर्षभरापासून पीडितेचे शोषण केलं. या प्रकरणाचा भांडाफोड रामनगर पोलिसांनी केला.

पैशांचा पाऊस पाडणारा ‘डीआर’

21 वर्षीय युवतीच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हिरावल्याने नातलग आणि आई तिचा सांभाळ करायचे. पीडितेने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण वर्ध्यात घेतले. पीडिता मूळची हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथील रहिवासी आहे. पीडितेच्या आई आणि काकाला बालू मंगरूटकर भेटला. त्याने पैशांचा पाऊस पाडणारा ‘डीआर’ (मांत्रिक) याच्याशी ओळख असल्याचे सांगितले.

विवस्त्र करुन शारीरिक छळ

आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होऊ या आमिषातून पीडितेची आई आणि काका हे दोघे वर्धातील कारला चौकात आले आणि पीडितेला भूलथापा मारत, धमकावून येरणगाव, नांदगाव शेत शिवारातील निर्जनस्थळी नेले. तिथे तिला विवस्त्र करुन शरीराला लिंबू लावण्याचा प्रकार केला. पीडितेने याला विरोध करुन तिथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकी देत पुन्हा असे अनेक प्रयोग केले. त्यामुळे पीडिता वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून घरातून पळून गेली. (Wardha Crime Black Magic Superstition)

पीडिता पळून गेल्याने वाचा फुटली

पीडितेच्या मिसिंगची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीस तपासात पीडितेला पोलीस ठाण्यात आणल्यावर तिने हा सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी अघोरी कृत्याचा भांडाफोड केला. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी तपास करत हा सर्व प्रकार अंनिसचे राज्य संघटक पंकज वंजारे यांना सांगितला.

दरम्यान पंकज वंजारे यांनी सखोल चौकशी करून हा सर्व प्रकार उघडकीस आणताच पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी अनिष्ठ प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 3 (2) भादंवि 354 अधिक 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

एकीकडे जग वैज्ञानिक क्रांतीतून पुढे जात आहे. पण काही जण अजूनही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचं दिसतय. पैशांचा पाऊस पडणं, गुप्तधनाच्या नावाखाली होणारे किळसवाणे प्रकार थांबण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

जादूटोणा करुन तुझ्यावर पैशांचा पाऊस पाडेन, अल्पवयीन मुलीच्या फसवणुकीचा प्रयत्न, पाच जण गजाआड

(Wardha Crime Girl Physical Assault Black Magic Superstition)

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....