दारुच्या नशेत महाशिवरात्रीची पूजा, त्रिशूळात मान अडकून वृद्धाचा मृत्यू

दुपारी कुणीही नसताना दारुच्या नशेत धुंद होऊन वृद्धाने घरीच महाशिवरात्रीची पूजा केली. (Wardha Mahashivratri Pooja Throat Trishool)

दारुच्या नशेत महाशिवरात्रीची पूजा, त्रिशूळात मान अडकून वृद्धाचा मृत्यू
thailand woman death

वर्धा : महादेवाचे त्रिशूळ वर्ध्यातील वृद्धासाठी मृत्यूचा फास ठरले. त्रिशूळात मान अडकल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Wardha Man Dies while performing Mahashivratri Pooja as Throat Slit by Trishool)

महाशिवरात्रीची पूजा करताना मान अडकली

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर येथे भवानी वार्डात ही घटना घडली. 60 वर्षीय विश्वनाथ टिकाराम टेकाम आणि पत्नी दोघे राहत होते. महाशिवरात्रीच्या दुपारी पत्नी घराच्या बाहेर गेली होती. यावेळी विश्वनाथ टेकाम हे घरात भगवान शंकराची उपासना करत होते.

महाशिवरात्रीला महादेवाच्या त्रिशूलाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. बऱ्याच भागात मनोकामना पूर्ण झाल्यावर शिव मंदिरात त्रिशूल भेट देण्याचीही प्रथा आहे.

दारुच्या नशेत धुंद होऊन पूजा

विश्वनाथ यांनी दुपारी मद्यपान केलं. त्यांच्या घरातच पूजा करण्यासाठी त्रिशूळ गाडलेला आहे. दुपारी कुणीही नसताना दारुच्या नशेत धुंद होऊन त्यांनी घरीच महाशिवरात्रीची पूजा केली. त्यानंतर त्रिशूळाच्या बाणात आपल्या मानेचा भाग घालून घेतला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली, परंतु संध्याकाळी उजेडात आली.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्लिपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नेमका मृत्यू कसा झाला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मद्यपानानंतर तोल गेल्याचा अंदाज

ठाणेदार शैलेश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ टेकाम हे दारुच्या नशेत असल्याने हे कृत्य घडले असावे. याशिवाय त्रिशूळाला हार घालताना तोल गेल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात अल्लिपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

जळगावातील धक्कादायक घटना, बस रिव्हर्स घेताना वृद्ध महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू

(Wardha Man Dies while performing Mahashivratri Pooja as Throat Slit by Trishool)

Published On - 9:27 am, Fri, 12 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI