AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ती वाचली, तिची बॅगही वाचली! पण बाटलीसाठी ज्या पद्धतीने ती पुन्हा ट्रेनच्या दिशेने गेली, ते जास्त डेंजर होतं

प्लॅटफॉर्मवर चढण्याआधी ही महिला प्लॅटफॉर्मवर असलेल्या व्यक्तींकडे हात करते आणि वर ओढण्यासाठी मदत मागते. त्याआधी ती आपली बॅग आणि पाण्याची बाटली प्लॅटफॉर्मवरही ठेवते. सुरुवातीला कुणीच मदतीला येत नाही. समोरुन गाडी येतेय, हे पाहून महिला वर चढण्याचा प्रयत्नही करते. पण तिचा प्रयत्न अपुरा ठरतो.

Video : ती वाचली, तिची बॅगही वाचली! पण बाटलीसाठी ज्या पद्धतीने ती पुन्हा ट्रेनच्या दिशेने गेली, ते जास्त डेंजर होतं
थरारक घटनाImage Credit source: Twitter Video Grab
| Updated on: Sep 10, 2022 | 11:11 AM
Share

मुंबई : रेल्वे रुळ ओलांडणं (Railway Track crossing) धोकादायच! वेळोवेळी सूचना केल्या जातात. पण लोकं काही ऐकात नाही.लोकांना रेल्वे रुळ ओलांडून जीव धोक्यात घालावासा का वाटतो? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या घटना वारंवार समोर येत राहतात. क्षणाचा विलंब आणि जीवाशी खेळ, अशा काळजाचा ठोका चुकणाऱ्या अनेक घटना सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये (CCTV Video) तुम्ही-आम्ही पाहिल्यात. पण आता समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोरुन भरधाव एक्स्प्रेस येतेय, हे दिसत असूनही एक महिला रेल्वे रुळावरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) जाण्याचा प्रयत्न करते. त्यात ती यशस्वीदेखील होते. पण भरधाव ट्रेन जात असताना ही महिला ज्या पद्धतीने पुढे जे कृत्य करते, ते पाहून बघणाऱ्या अंगावर काटाच येईल.

नेमकं काय घडलं?

ही घटना उत्तर प्रदेशच्या फिरोझाबाद रेल्वे स्थानकातली आहे. एक भरधाव ट्रेन दुरुन येताना दिसतेय. तरीही एक महिला रेल्वे रुळ क्रॉस करुन प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करताना दिसते. आधी महिला आपल्या हातातली बॅग, पाण्याची बाटली प्लॅटफॉर्मवर ठेवते. त्यानंतर स्वतः वर चढण्याचा प्रयत्न करते. इतक्यात प्लॅटफॉर्मवर असणारा जीआरपी कॉन्स्टेबल या महिलेला पाहतो आणि तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेतो.

भरधाव एक्स्प्रेस धडधडत अंगावर जाण्याच्या अवघ्या काही क्षण आधी या महिलेला रेल्वे कॉस्टेबल प्लॅटफॉर्मवर ओढतो. महिलेसह तिची बॅगही सुरक्षित राहते. पण अंगावर काटा आणणारी घटना तर याही पुढे घडते.

प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन जबरदस्त वेगाने धडधडत जात असते. इतक्यात ही महिला ट्रेनच्या दिशेने पुढे सरसावते. खाली वाकते आणि आपली पाण्याची बाटली उचलून पुन्हा निवांतपणे मागे वळते. महिलेची ही कृती काळजाचा ठोका चुकवणारी असते.

पाहा थरारक व्हिडीओ :

प्लॅटफॉर्मवर चढण्याआधी ही महिला प्लॅटफॉर्मवर असलेल्या व्यक्तींकडे हात करते आणि वर ओढण्यासाठी मदत मागते. त्याआधी ती आपली बॅग आणि पाण्याची बाटली प्लॅटफॉर्मवरही ठेवते. सुरुवातीला कुणीच मदतीला येत नाही. समोरुन गाडी येतेय, हे पाहून महिला वर चढण्याचा प्रयत्नही करते. पण तिचा प्रयत्न अपुरा ठरतो.

थोडक्यात वाचली!

अखेर रेल्वे कॉन्स्टेबल तिच्या दिशेने धावल्यामुळे थोडक्यात या महिलेचा जीव वाचतो. या महिलेसह तिची बॅगही तो मागे ओढतो. पण आपली पाण्याची बाटली घेण्यासाठी ही महिला ज्या पद्धतीने पुन्हा भरधाव रेल्वेच्या दिशेने वळते, ते दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं आहे.

दैवं बलवत्तर म्हणून ही महिला अगदी थोडक्यात बचावलीय. या घटनेनंतर रेल्वे रुळांवर प्लॅटफॉर्म क्रॉस करणं किती जीवघेणं ठरु शकतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे रेल्वे ब्रीजचा वापर करणं, कधीही योग्य. रेल्वे रुळ क्रॉस करण म्हणजे जीवाशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे, हे यानिमित्तानं पुन्हा ठळकपणे दिसून आलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.