AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दृश्यम’ चित्रपट पाहिला आणि महिलेनं तसंच काहीसं केलं, गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांची दमछाक; अखेर…

चित्रपट आणि वास्तविक जीवन यात फरक आहे. अनेकदा गुन्हेगार चित्रपटाती सीन प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात यश मिळत नाही. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील सुरतमध्ये घडला आहे.

'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि महिलेनं तसंच काहीसं केलं, गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांची दमछाक; अखेर...
'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि महिलेनं तसंच काहीसं केलं, गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांची दमछाक; अखेर..
| Updated on: Jul 04, 2023 | 3:27 PM
Share

सुरत : गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेनं आपल्या प्रियकराचं प्रेम परत मिळवण्यासाठी टोकाचं पाऊल उचललं. आपल्या अडीच वर्षाच्या पोटच्या गोळ्याचं जीवन संपवलं आणि पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अडीच वर्षाच्या मुलाला शोधण्यासाठी कोपरान कोपरा पाहिला पण मुलाचा काही शोध लागला नाही. पोलिसांनी मुलाच्या आईला बेपत्ता मुलाबाबत वारंवार विचारलं पण तिने पोलिसांना वारंवार फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस बेपत्ता असलेल्या मुलाच्या शोधात पुरते हैराण झाले. पण तपासात मुलाची आईचं वागणं संशयास्पद वाटलं आणि डाव उघडकीस आला.

काय झालं प्रकरणात

सुरतच्या दिंडोली भागातील कंस्ट्रक्शन साईटवर आरोपी नयना मंडवी काम होती. आरोपी महिला झारखंडमध्ये राहणारी आहे. पोलिसात अडीच वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार तिने नोंदवली होती. यासाठी पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. डॉग स्क्वॉडच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्या साईटवर मुलगा कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपी महिलेला वारंवार प्रश्न विचारले. पण तिने पोलिसांसमोर खोटेपणा सुरूच ठेवला.

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर महिलेने सांगितलं की, प्रियकराने तिच्या मुलाला किडनॅप केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत महिलेच्या प्रियकराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो काही सुरतमध्ये सापडला नाही. पोलिसांनी त्याला संपर्क साधला तो म्हणाला की, मी कधीच सुरतमध्ये नव्हतो. त्यामुळे पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणताना चांगलीच दमछाक झाली.

अखेर महिलेनं दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी पुन्हा एकदा महिलेच्या मुलाचा शोध घेण्यासाठी काम करत असलेल्या ठिकाणी तपास केला. तिथे त्यांना कोणताही पुरावा हाती लागला नाही. त्यानंतर पोलीस वारंवार त्या महिलेला प्रश्न विचारत राहिले. त्यानंतर पोलिसांसमोर तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि मुलाला मारल्याची कबुली दिली. मृतदेह कुठे लपवला आहे याबाबत विचारलं असता तिने पोलिसांना पुन्हा खोटी माहिती दिली.

आरोपी महिलेने पहिल्यांदा मुलाला खड्ड्यात पुरल्याचं सांगितलं. तिथे शोध घेतला असताना तिथे काहीच आढळून आलं नाही. त्यानंतर महिलेनं मुलाला डबक्यात फेकल्याचं सांगितलं. तिथेही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवला आणि आरोपी महिलेनं मुलाच्या मृतदेह कंस्ट्रक्शन करते असलेल्या टॉयलेटच्या टाकीत फेकल्याची कबुली दिली. पोलिसांना त्या ठिकाणाहून मुलाचा मृतदेह सापडला.

आरोपी महिलेनं स्वत:च्या मुलाला का मारलं?

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर मुलाला का मारलं असा प्रश्न विचारला. त्यावर तिने दिलेली कबुली ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मुळची झारखंडची आहे. तिचा प्रियकर झारखंडमध्ये राहतो. पण मुलासह तिला जवळ करणार नाही असं त्याने तिला सांगितलं होतं. त्यामुळे प्रेमासाठी तिने मुलाला मारलं.

इतकंच काय तर गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी दृश्यम चित्रपट पाहिला. मृतदेह कसा लपवायचा याबाबत माहिती घेतली. चित्रपटात मृतदेह पोलिसांना काही करू सापडत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करणं कठीण होतं. महिलेला वाटलं की खऱ्या आयुष्यात असंच होऊ शकतं. पण पोलिसांनी गुन्ह्याची उकल तिला बेड्या ठोकल्या.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.