AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉचमनने मध्यरात्री काढले महिलांचे अश्लील व्हिडीओ, उच्चभ्रू सोसायटीतील घटना…

नंदलाल टिकाराम डांगी हा 28 वर्षाचा असून रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून महिलांचे चित्रीकरण करीत असल्याचे समोर आले.

वॉचमनने मध्यरात्री काढले महिलांचे अश्लील व्हिडीओ, उच्चभ्रू सोसायटीतील घटना...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Sep 28, 2022 | 7:56 PM
Share

नाशिक : चंदिगढ येथील विद्यापीठाच्या वसतिगृहातील एमएमएस (MMS) प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या वॉचमनने सोसायटीत राहणाऱ्याच महिलांचे मध्यरात्री अश्लील अवस्थेत व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटणेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून वॉचमनवर (Watchman) कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी देवळाली पोलिसांनी आलेल्या तक्रारीवरुण वॉचमनच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लॅमरोड दस्तगिर बाबा रोड येथे एका सोसायटीत गेल्या दहा वर्षांपासून नंदलाल टिकाराम डांगी रखवालीचे काम करत आहेत.

नंदलाल टिकाराम डांगी हा 28 वर्षाचा असून रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे सोसायटीमध्ये प्रवेश करून महिलांचे चित्रीकरण करीत असल्याचे समोर आले.

या प्रकरणी पीडित महिला आणि साक्षीदार महिलांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानंतर देवळाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवळाली पोलिसांनी या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करत संशयित आरोपीला अटक केली आहे. आणि त्याचा मोबाईल फोन देखील जमा केला आहे .

संशयित आरोपी नंदलाल टिकाराम डांगी याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या पथकाकडून अधिकचा तपास केला जाणार आहे.

या प्रकाराने उच्चभ्रू परिसर असलेल्या सोसायटीमधील वॉचमनचे आधार कार्ड, फोटो आणि इतर माहिती पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन देवळाली पोलीसांनी केले आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...