AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikki Murder Case : एकीला पाठवून पस्तावलो, आता दुसरीला कधीच पाठवणार नाही.. निक्कीच्या मृत्यूमुळे आईने फोडला हंबरडा !

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील कसना येथे निक्कीला तिच्या पती आणि सासूने जिवंत जाळले. निक्की आणि तिची मोठी बहीण कांचन यांचे लग्न एकाच कुटुंबातील दोन मुलांशी झाले होते. निकीच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. निकीच्या आईला तर मुलीचा वियोग सहनच होत नाहीये,यांनी हंबरडा फोडत म्हटलं की ते त्यांची दुसरी मुलगी कांचनला पुन्हा तिच्या सासरच्या घरी पाठवणार नाहीत.

Nikki Murder Case : एकीला पाठवून पस्तावलो, आता दुसरीला कधीच पाठवणार नाही.. निक्कीच्या मृत्यूमुळे आईने फोडला हंबरडा !
nikki death case
| Updated on: Aug 25, 2025 | 3:56 PM
Share

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉएडा येथे निक्की या विवाहीत महिलेच्या हत्येमुळे सर्वच हादरले आहेत. निक्कीला तिचा पती विपीन भाटी आणि सासूने मिळून जिवंत जाळलं असा आरोप आहे. हुंड्याच्या लोभापायी त्यांनी तिचा जीव घेतला. मात्र या प्रकरणामुळे शहरातील आणि संपूर्ण देशातील लोकंही हादरले आहेत. सर्व स्तरांतून, सोशल मीडियावरही कमेंट करून लोकं याप्रकरणात न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी निकीचा पती, सासू, सासरे आणि दीराला अटक केली आहे.

याच दरम्यान आता मृत निक्कीच्या आईची एक प्रतिक्रिया समोर आली आहे. निकीची त्या करणाऱ्या तिच्या सासरच्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच निक्की तर गेली पण आता मोठी मुलगी कांचनला पुन्हा त्या घरात कधीच पाठवणाकर नाही, असंही त्यांनी म्हटलं.

निक्कीच्या मृत्यूनंतर रडून रडून तिच्या आईची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर निकीचे कुटुंब संतप्त झाले आहे. आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी ते करत आहेत. निकीची सासू हीच तिच्या हत्येच्या कटामागील सूत्रधार असल्याचा दावा निक्कीच्या वडिलांनी केला आहे. त्यानतंर तिच्या आईचं विधान समोर आलं आहे. आता आम्ही आमच्या मोठ्या मुलीला, कांचनला पुन्हा कधीच त्या घरात पाठवणार नाही. एकीला तिथे पाठवल्याचा आम्हाला आधीच पश्चाताप होतोय, आता हिला नाही पाठवणार, असं त्यांनी वेदनेने भरलेल्या आवाजात सांगितलं.

पती आणि सासूला आग लावा

त्यांनी जसं माझ्या मुलीला जिवंत जाळले तसे त्यांनाही जाळून टाकावं, विपिन आणि त्याच्या आईला तसंच जाळावं, अशा शब्दांत निक्कीच्या आईने संताप व्यक्त केला. आणि निक्कीचे सासरे, दीर यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली. या चारही आरोपींना तर फाशीच दिली पाहिजे, तेव्हाच न्याय मिळेल अशी मागणी निक्कीच्या वडिलांनी केली आहे.

Nikki Murder Case : पतीचं एन्काऊंटर, सासूला अटक, वडील… निक्की केसमध्ये काय काय घडलं ?

रील बनवणं विपिनला आवडायचं नाही

पोलिस तपासात अशी माहिती समोर आली की, निक्की आणि कांचन आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पार्लर चालवत होत्या. दोन्ही बहिणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय होत्या. त्यांनी त्यांच्या पार्लरच्या नावाने एक इंस्टाग्राम अकाउंट देखील तयार केले होते. कांचनचे अकाउंट पब्लिक आहे, ज्यावर तिचे खूप फॉलोअर्स आहेत, तर निक्कीचे अकाउंट प्रायव्हेट आहे. कांचन आणि निक्की रील बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट करायच्या, पण विपिनला त्यांचे रील आवडायचे नाहीत. दोन्ही बहिणी जेव्हा रील बनवायच्या, तेव्हा विपिन आणि त्याचे कुटुंब निक्की आणि कांचनशी खूप भांडायचे.

दरम्यान, या घटनेशी संबंधित एक कथित व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी विपिन घराबाहेर उन्मादात पळताना दिसत आहे. सोशल मीडियावरील एक गटाने असाही दावा केला आहे की, निक्कीला खोलीत जिवंत जाळण्यात आले तेव्हाचा हा व्हिडीओ आहे आणि त्यावेळी विपिन घराबाहेर होता. मात्र, TV9 या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.