दारू पिण्यासाठी चढले टॉवरवर, पण, अशी झाली पंचाईत…

| Updated on: Sep 18, 2022 | 5:32 PM

मद्यपींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आता हे कसे उतरणार याची चिंता त्यांना लागली होती. या संपूर्ण प्रकाराने महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला.

दारू पिण्यासाठी चढले टॉवरवर, पण, अशी झाली पंचाईत...
दोन मद्यपी टॉवरवर चढून दारू पितात तेव्हा...
Image Credit source: t v 9
Follow us on

यवतमाळ : दोन मित्र दारू पिण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते. ते अखेर एका टॉवरवर चढले. पण, तिथं दारु प्यायल्यानंतर त्यांना नशा आली. या नशेत ते खाली उतरण्याच्या परिस्थितीत नव्हते. नागरिकांना हे दोघे आज सकाळी दिसले. पण, टॉवरवर चढल्यानंतर त्यांनी आधी दारु प्याली. नशा चढल्यानंतर त्यांची आरडाओरड सुरू झाली. मद्यपींच्या घरचे कुटुंबीय आले. आता हे उतरणार कसे, अशी चिंता घरच्यांना वाटू लागली. त्यातून घरच्यांचा आकांत सुरू झाला.

दारुड्यांची ही घटना आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या भोसा येथील. आज सकाळीच दोन दारुडे दारू पिण्यासाठी टॉवरवर चढले. त्यांनी केलेल्या विरुगिरीने साऱ्यांनाच वेठीस धरले.

अनिकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. दोघांनी दारूची नशा करण्यासाठी चक्क टॉवरवर बैठक मांडली. टॉवरवरून आरडाओरड सुरू झाल्याने गर्दी जमा झाली.

मद्यपींच्या घरचे कुटुंबीय आरडाओरड करून रडायला लागले. त्यानंतर पोलिसांना व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी दारुड्यांना सुखरूप उतरविले.

दारुड्यांना उतरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दुसऱ्याच्या आधारानं हे दोघेही शेवटी टॉवरवरून सुखरूप खाली उतरले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

मद्यपींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आता हे कसे उतरणार याची चिंता त्यांना लागली होती.

या संपूर्ण प्रकाराने महिलांनी पोलिसांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. भोसा येथे अवैध दारू, गांजा विक्रीचे अनेक अड्डे तयार झालेत. त्यामुळं कर्त्या पुरुषांना, तरुण, शाळकरी मुलांना दारू, गांजाचे व्यसन जडले.

भोसा गावात दारुमुळं गुन्हेगारी वाढली. महिला, मुलींना घराबाहेर पडणे कठीण झाले. पोलीस मात्र मागणी करूनही कारवाई करीत नाहीत. असा आरोप संतप्त नागरिकांनी व्यक्त केला.