Video : उद्धव ठाकरेंचं अस्तित्व काय?, नारायण राणे यांनी स्पष्टचं सांगितलं

उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात, देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

Video : उद्धव ठाकरेंचं अस्तित्व काय?, नारायण राणे यांनी स्पष्टचं सांगितलं
नारायण राणे म्हणतात, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला...Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 4:16 PM

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजपासून विदर्भ दौरा सुरू केला. विदर्भात कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याकडं कसं पाहत असा प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला शुभेच्छा.. दुसरीकडं मुंबई महापालिकेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. त्यात सर्व पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होता. यावर नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं अस्तित्व आहेच कुठं. ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं.

तसंच त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे.

चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. जे उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळं त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले.

दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूनं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार कुठंही बाहेर जाऊ नये, यासाठी मी स्वतः मंत्र्यांना भेटलो.ते संबंधित कंपनीशी पुन्हा बोलताहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत,असंही राणे म्हणाले.

2024 साली भाजपला 303 ऐवजी 403 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दौरे सुरू केलेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....