AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनच्या रात्री ओमप्रकाशसोबत असं काय घडलं, दुसऱ्याच दिवशी त्याने.. बायकोवर गुन्हा दाखल

अज्ञात नंबरवरुन आलेल्या या फोन कॉल नंतर ओमप्रकाश आतून खूप घाबरलेला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने वडिल अशोक यांना सर्वकाही सांगितलं. लग्नामुळे त्याच्या आयुष्यात आनंद येण्याऐवजी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं.

हनीमूनच्या रात्री ओमप्रकाशसोबत असं काय घडलं, दुसऱ्याच दिवशी त्याने.. बायकोवर गुन्हा दाखल
Groom (Representative Image)Image Credit source: Representative Image
| Updated on: May 19, 2026 | 4:34 PM
Share

लग्न ही कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाची घटना असते. वधू-वर दोघांनी मिळून लग्नाची अनेक स्वप्न डोळयात साठवलेली असतात. त्यात हनीमूनचा काळ विशेष असतो. यात तुम्ही जोडीदार म्हणून शरीराने नाही, मनाने सुद्धा जवळ येता. पण ओमप्रकाशचा विवाह अपवाद ठरला. लग्नामुळे त्याच्या आयुष्यात आनंद येण्याऐवजी कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण लग्नाच्या दुसऱ्यादिवशी त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. नवविवाहित नवरदेवाने होडल रेल्वे स्टेशनजवळ धावत्या ट्रेन समोर उडी मारुन आपला जीवन प्रवास संपवला. ओमप्रकाशच्या भावाचा आरोप आहे की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच ओमप्रकाशचा काही कारणावरुन पत्नीसोबत वाद झाला होता.

त्यानंतर नवरीमुलीच्या ओळखीच्या लोकांनी त्याला फोन करुन मानसिक दृष्टया त्रास दिला. ब्लॅकमेलं केलं. बदनाम करण्याची धमकी दिली. त्यामुळे हा तणाव आणि त्रासाला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचललं, असा ओमप्रकाशच्या भावाचा आरोप आहे. हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील ही घटना आहे. ही घटना घडून गेल्यानंतर जवळपास 16 दिवसांनी रेल्वे पोलिसांनी ओमप्रकाशची पत्नी आणि अन्य चार युवकांविरोधात त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रुममधून आला भांडणाचा आवाज

ओमप्रकाशचा भाऊ जय भगवानने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. त्याने सांगितलं की, 29 एप्रिलला ओमप्रकाशच लग्न उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील शेरगढ येथे राहणाऱ्या युवतीसोबत हिंदू रिती-रिवाजाने संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्यादिवशी 30 एप्रिलला कुटुंब मोठ्या आनंदाने नवरीमुलीला आपल्या घरी घेऊन आलं. 30 एप्रिलच्या रात्री भूमिका आणि ओमप्रकाशमध्ये कुठल्यातरी गोष्टीवरुन वादावादी झाली. रुममधून येणारा भांडणाचा आवाज अन्य लोकांनी सुद्धा ऐकला.

फोन करणारे नवरीमुलीच्या ओळखीचे

तक्रारीनुसार, मधुचंद्राच्या दुसऱ्यादिवशी 1 मे रोजी सकाळी 7 वाजता वेगवेगळ्या नंबरवरुन ओमप्रकाशच्या फोनवर चार वेगवेगळ्या नंबरवरुन फोन आले. अजय निषाद, संजीव, नारायण सिंह आणि वेदराम यांनी फोन केल्याचा आरोप आहे. फोन करणारे नवरीमुलीच्या ओळखीचे होते.

ओमप्रकाश आतून खूप घाबरलेला

अज्ञात नंबरवरुन आलेल्या या फोन कॉल नंतर ओमप्रकाश आतून खूप घाबरलेला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने वडिल अशोक यांना सर्वकाही सांगितलं. भूमिकाशी संबंधित लोक त्याला परिणाम भोगण्याची धमकी देत आहेत. त्रास देतायत. वडिलांनी त्याला हिम्मत देण्याचा प्रयत्न केला. पण फोन कॉल्स बंद झाले नाहीत. त्यानंतर 1 मे रोजी ओमप्रकाशने धावत्या ट्रेन समोर उडी मारुन जीवन प्रवास संपवला.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी..
पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा? पोलीस शिपाई भरतीची रद्द झालेली लेखी...
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण
मोठी खळबळ! थेट छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण.