पतीचा अश्लील व्हिडीओ बनवला, नंतर दिली धमकी… पत्नीच्या भीतीने तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात!

एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. पण त्यापूर्वी पत्नीने त्याचा अश्लील व्हिडीओ बनवला. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय होतं...

पतीचा अश्लील व्हिडीओ बनवला, नंतर दिली धमकी... पत्नीच्या भीतीने तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात!
Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 18, 2025 | 8:16 PM

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे की तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी पत्नीने नको ते केले. तिथे थेट पतीचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घ्या…

स्योहारा परिसरातील एका गावात राहणाऱ्या या व्यक्तीचं लग्न सुमारे दहा वर्षांपूर्वी कोतवाली देहात परिसरातील एका तरुणीशी झालं होतं. दोघांना चार मुलं आहेत. पती गेल्या दीड वर्षांपासून मुरादाबादमध्ये भाड्याच्या घरात राहून दुकान चालवत होता. तो महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी यायचा, जेणेकरून मुलं आणि पत्नीला भेटता येईल. पण गेल्या एका वर्षापासून पत्नीचं वागणं अचानक बदललं. ती वारंवार भांडणं करू लागली. पतीला संशय आला की पत्नीचं दुसऱ्या कोणाशीतरी अनैतिक संबंध आहे. जेव्हा त्याने तपास केला तेव्हा त्याचा संशय खरा ठरला.

वाचा: 6 वर्षे फिरत होता फेक IAS बनून, 150 लोकांकडून लुटले 80 कोटी… मग कायद्याने…

पतीचा अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

पतीने आरोप केला आहे की पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून घरातून सुमारे अडीच लाख रुपयांचे सामान चोरले आणि तो सर्व सामान तिच्या प्रियकराला दिला. जेव्हा पतीने याचा विरोध केला तेव्हा पत्नीने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नीने त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि पैशाची मागणी केली. सामाजिक बदनामीच्या भीतीने त्याने नाईलाजाने आपल्याच पत्नीच्या प्रियकराच्या खात्यात 11,000 रुपये पाठवले.

प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येची योजना

पण कहाणी इथेच संपली नाही. काही दिवसांनंतर पतीला पत्नीच्या मोबाइलमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली, ज्यामध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर मिळून त्याच्या हत्येची योजना आखत होते. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी प्रकरण नोंदवून घेतलं आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता पाहायचं आहे की तपासात काय सत्य समोर येतं? हा पतीचा खोटा आरोप आहे की खरंच एका पत्नीने आपल्या पतीला मार्गातून हटवण्याचा कट रचला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.