जेवणातून गुंगीचं औषध, पती बेशुद्ध होताच प्रायव्हेट पार्टची नस कापली; त्यानंतर जे घडलं..
घरगुती वादानंतर एका महिलेने तिच्याच नवऱ्याला गुंगीचं औषध खायला घातलं आणि रागाच्या भरात त्याच्या प्रायव्हेट पार्टची नस कापली. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर त्या महिलेने घरातील दागिने आणि रोख रक्कम घेतली आणि ती फरार झाली. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पती-पत्नीमध्ये वाद हे होतल असतात, प्रत्येक घरात भांडणं होतंच असतात, पण रागाच्या भरात एखादी व्यक्ती असं काही करून बलते, की समोरचा माणूस आयुष्यातून उठतो. असाच काहीस प्रकार उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडला. कौटुंबिक मुद्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. मात्र या वादामुळे ती महिला प्रचंड भडकली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं. रागाच्या भरात भल्या-बुऱ्याचं भान विसरलेल्या त्या महिलेने प्रथम तिच्या नवऱ्याला जेवणातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याला बेशुद्ध केलं. धक्कादायक गोष्ट म्हणजेत्यानंतर संतापाच्या भरात त्या महिलेने तिच्याच पतीच्या प्रायव्हेट पार्टची नसच कापून टाकली. पतीला तशाच गंभीर अवस्थेत टाकून त्या महिलेने घरातील जागिने आणि कॅश घेतली आणि फरार झाली. कुटुंबियांनी त्या इसमाला जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि घरात कल्लोळ माजला, त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस आरोपी पत्नीच्या शोधात सहभागी झाले आहेत. सध्या आरोपी पत्नी फरार आहे.
कुठे घडलं प्रकरण ?
हे संपूर्ण प्रकरण बरेली जिल्ह्यातील सीबीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. तेथे राहणाऱ्या तरुणाचा अडीच वर्षांपूर्वी भोजीपुरा पोलिस ठाणे हद्दीतील तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले. पत्नीच्या सांगण्यावरून हा तरुण कुटुंबापासून दूर राहू लागला. मात्र घटना घडली त्या संध्याकाळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यानंतर पत्नीने जेवणात गुंगीचं औषध मिसळून पतीला खाऊ घातलं, असा आरोप आहे. तो बेशुद्ध झाल्यावर आरोपी महिलेने त्याच्या गुप्तांगाची नस ब्लेडने कापली. एवढंच नव्हे तर घटनेनंतर आरोपी पत्नीने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. त्या जखमी तरूणाच्या कुटुंबीयांना ही घटना कळली आणि त्यानी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित तरूणाला रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी तक्रार नोंदवून महिलेचा शोध सुरू केला आहे.
पत्नीचे दुसऱ्या तरूणाशी अफेअर ?
पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याचा आरोप पतीने केला आहे. ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. ती रात्रभर फोनवर बोलत असते. फोनवर बोलू नकोस असं सांगितल्यावर ती सारखी भांडायची असं सांगत पीडित पतीने न्यायाची मागणी केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी महिलेला शोधण्याचा कसून प्रयत्न करत आहोत, असे पोलिसांनी नमूद केलं.