भावाच्या लग्नात प्रियकराला माहेरी बोलावले,अन् नवऱ्याचा काटा काढला
पत्नीने तिच्या भावाच्या लग्नासाठी आलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. या घटनेसाठी वापरलेले ६ मोबाईल फोन, २ मोटारसायकली, रक्ताने माखलेले कपडे आणि बूट आणि हत्येत वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातून नवऱ्याचा काटा काढण्याच्या घटना अलीकडे खूपच वाढल्या आहेत. अलिकडे अशा घटनांचे प्रमाण वाढले असताना एका तरुणाला त्याच्या सासरी बोलावून पत्नीनेच बॉयफ्रेंडच्या मदतीने त्याचा काटा काढल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुणाचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आली आहे. पत्नीनेच अशा प्रकारे प्रियकराच्या मदतीनेच आपल्या पतीची हत्या केल्याने सर्वत्र याची चर्चा होत आहे. .
हरेंद्र वर्मा यांची पत्नी उमा देवी हीचे तिच्या गावातील जितेंद्र वर्मा या तरुणाशी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमकरण सुरु होते. दोघांनी मिळून हरेंद्र वर्मा यांच्या हत्येचा कट रचला. दोघांनी मिळून हरेंद्र वर्मा याचा अडसर दूर करण्यासाठी कट रचला होता. पत्नी उमा देवी हीने तिच्या भावाच्या लग्नात हरेंद्र वर्मा याला आपल्या माहेरी बोलावले. त्यानंतर शुक्रवारी रात्री बलरामपूर येथे आपल्या सासरी गेलेल्या हरेंद्र याची कट रचून प्रियकरासह ७ जणांनी गळा चिरुन हत्या केली.
येथे पाहा फोटो –
या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपुर जिल्ह्यातील महराजगंज तराई ठाण्याच्या हद्दीत जुगलीकला गावात सासरी आलेल्या हरेंद्र वर्मा यांची हत्या झाली. या हत्येच्या प्रकरणात त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह सात लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
सासरी बोलावले आणि नंतर
शुक्रवारी रात्री जितेंद्र वर्माने हरेंद्र वर्मा याला त्याच्या सासरी बोलावले आणि नंतर त्याने मित्राच्या मदतीने त्याचा चाकूने गळा चिरून हत्या केली. या प्रकरणात हत्येच्या कटात सहभागी असलेल्या त्याच्या पत्नीसह ७ जणांना अटक झाली आहे. हरेंद्र वर्मा याचे रक्ताने माखलेले कपडे आणि चाकू जप्त केला आहे. या हत्यप्रकरणात पत्नी उमा देवी, प्रियकर जितेंद्र वर्मा, मुकेश कुमार, सचिन यादव, अखिलेश यादव, संतोष, मुकेश साहू यांच्यासह ७ जणांना पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस अधिक्षकांनी म्हटले आहे.