AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावई-भावोजीसोबत सासूचे संबंध, दररोज वेगळा पुरुष… पतीला कळताच त्यालाही शेतात नेला अन्..

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बायकोचे तिच्या जावयाशी आणि भावोजीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा नवऱ्याला याची माहिती मिळाली, तेव्हा बायकोने असे काही केले की तुम्ही थक्क व्हाल...

जावई-भावोजीसोबत सासूचे संबंध, दररोज वेगळा पुरुष... पतीला कळताच त्यालाही शेतात नेला अन्..
| Updated on: Aug 19, 2025 | 3:20 PM
Share

सध्या देशभरातून अनैतिक संबंधाच्या अनेक घटना कानावर येतात. कधी जावयासोबत सासू पळून जाते तर कधी सासऱ्याचा डोळा सूनेवर असतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये तर अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. नुकताच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका बायकोचे तिच्या जावयाशी आणि भावोजीशी अनैतिक संबध होते. याबाबत जेव्हा तिच्या नवऱ्याला कळाले तेव्हा त्या धक्काच बसला. पण नंतर जे काही घडलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया…

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही हादरवणारी घटना घडली आहे. मुरलीगंज पोलीस ठाण्यात उर्मिला देवी नावाची एक महिला तक्रार घेऊन पोहोचली. तिने सांगितले की, तिचा मुलगा जसवंत यादव आणि सून पुनीता देवी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयात खटला सुरू होता. याच दरम्यान, पुनीताचे तिचा जावई अमित कुमार आणि भावोजी राजेश यादव यांच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले. जसवंत या नात्यांचा विरोध करत होता. यामुळे वैतागलेल्या पुनीताने तिच्या प्रियकरांसोबत मिळून नवऱ्याची हत्या घडवून आणली. उर्मिला देवी ही पुनीताची सासू होती.

वाचा: पुतिनला एकदाच सायको म्हणाली, नंतर मॉडेल BMSमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडली,नेमकं काय घडलं?

प्रियकराशी मुलीचे लग्न लावले

सासूने आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, पुनीताने आपल्या 12-13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लग्न तिचा प्रियकर अमितशी लावून दिले. एवढेच नाही, तर ती सतत एक बीघा जमीन अमितच्या नावावर नोंदवण्यासाठी दबाव टाकत होती. जेव्हा जसवंतने जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा पुनीताने हत्येचा कट रचला.

17 ऑगस्टच्या रात्री सुमारे 9 वाजता पुनीताने अमित, तिचा भावोजी राजेश यादव आणि काही इतर साथीदारांसह मिळून जसवंतला खते आणण्याच्या बहाण्याने बोलावले. त्याला शेतात घेऊन जाऊन सर्वांनी मिळून धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला. हत्येनंतर त्याचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला.

रक्ताने माखलेला मृतदेह सापडला

दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जसवंतचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्याचा गळा क्रूरपणे कापलेला होता. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. यानंतर नातेवाइकांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी मधेपुरा सदर रुग्णालयात पाठवण्यात आला. जसवंतचा चुलत भाऊ रामानंद यादव यानेही आरोपाची पुष्टी करत सांगितले की, पुनीता बऱ्याच काळापासून अमितशी संबंधात होती. हे लपवण्यासाठी तिने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न अमितशी लावले आणि पतीपासून अंतर राखले. ती पतीला सोडून अमित आणि मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होती.

पोलिसांची कारवाई

मुरलीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित कुमार यांनी सांगितले की, मृतकाच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पत्नी पुनीता, तिचा भावोजी राजेश यादव आणि एका अन्य सह आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा