
गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांनी आपल्या पतीची हत्या केल्याची किंवा त्याला मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आताही मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे एका महिलेने आयफोन न खरेदी केल्याने पतीला मारहाण केली आहे. तसेच तिने पतीला घराच्या छतावर नेले आणि त्याला छतावरून खाली ढकलले. छतावरून पडल्याने पतीली गंभी दुखापत झाली असून त्याला पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर पतीने आपल्या पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेच्या तपासाला सुरूवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ग्वाल्हेरमधील ठाकूर मोहल्ला परिसरात राहणाऱ्या शिवम वंस्कर याला पत्नीने मारहाण केली आहे. तो मध्य प्रदेशातील तिमकगढ जिल्ह्यातील रहिवासी आहे. मात्र तो ग्वाल्हेरमध्ये खाजगी नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्याचे 2 वर्षांपूर्वी झाशी येथील साधना नावाच्या मुलीशी लग्न झाले आहे. लग्नानंतर साधना शिवमकडे वेगवेगळ्या गोष्टींचा हट्ट करत असे. शिवम सुरुवातीला तिचा हट्ट पुरवत असे. मात्र कालांतराने साधनाच्या मागण्या वाढत गेल्या.
काही दिवसांपूर्वी साधनाने शिवमला आयफोनचा हट्ट धरला होता. मात्र तिचा हा हट्ट पुरवणे शिवमला शक्त नव्हते. शिवमने तिला नवीन मोबाईल घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पत्नीने तिला आयफोनचा हट्ट धरला. शिवमने तिला आपली आर्थिक परिस्थिती आयफोन खरेदी करण्याची नाही असं तिला सांगितलं. मात्र या मुद्द्यावरून दररोज दोघांमध्ये वाद होत असत.
काही दिवसांनंतर साधनाने पुन्हा पतीकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला. शिवमने तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. पत्नीने शिवमला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिने त्याला कामानिमित्त छतावर नेले आणि त्याला छतावरून खाली ढकलले. शिवम पडल्याने त्याचा पाय मोडला तसेच त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर शिवमने पत्नीच्या कृत्याची पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याने पत्नीवर गंभीर आरोप केले. माझी पत्नी आणि भाऊ मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देतात. तसेच त्यांनी माझ्यावर हल्ला केला. आता शिवमच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या अधिकचा तपास सुरू आहे.