malegaon bomb blast : मालेगाव ब्लास्ट केसमध्ये परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप, साक्षीदार डोकेदुखी वाढवणार?

malegaon bomb blast : मालेगाव ब्लास्ट केसमध्ये परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप, साक्षीदार डोकेदुखी वाढवणार?
Parambir Singh

2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये आज विशेष एनआयए कोर्टात साक्षीदाराने धक्कादायक खुलासे केले आहेत. यात साक्षीदाराने एटीएसवरच गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 28, 2021 | 4:10 PM

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव स्फोटात आता नवे ट्विस्ट आले आहे. यात परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झाला आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील साक्षीदार पलटल्याने एटीएसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण 2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये आज विशेष एनआयए कोर्टात साक्षीदाराने धक्कादायक खुलासे केले आहेत. यात साक्षीदाराने एटीएसवरच गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांच्यावर काय आरोप?

काही लोकांची नावे या केसमध्ये घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप साक्षीदाराकडून करण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो. देवधर काकाजी , इंद्रेश कुमार यांना या गुन्ह्यात गुंतवण्यासाठी साक्षीदारावर दबाव टाकल्याचे साक्षिदाराने कोर्टात साक्ष देताना सांगितले आहे. त्यामुळे एटीएसची डोकेदुखी वाढली आहे. एनआयएने हजर केलेला साक्षीदार फिरला असून त्यानेच दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) परमबीर सिह आणि श्रीराव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी झाली आहे.

काय म्हणाला साक्षीदार?

आज झालेल्या सुनावणीत ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 ची साक्ष झाली. साक्षीदाराने न्यायालयाला साक्ष देताना सांगितले की, एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला की जर साक्षीदाराने त्यांच्या म्हणण्यानुसार जवाब दिला नाही तर त्यांच्या कुटुंबाला इजा पोहचवण्यात येईल, आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावंचा उल्लेख करावा ह्यासाठी एटीएस दबाव टाकत असल्याचा दावा साक्षीदाराने कोर्टात आज केला. या उच्चपदस्थ आरएसएस पदाधिकाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो देवधर, काकाजी, इंद्रेश कुमार यांची नावे होती. तत्कालीन एटीएसचे अधिकारी परमबीर सिंह आणि डीसीपी श्रीराव यांच्यावरील या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 15 साक्षीदारानी आपली साक्ष फिरवली आहे.

Nashik| नाशिकमधल्या मखमलाबाद परिसरातल्या कालव्यात तीन मुले बुडाली!

महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला

सोशल मीडियावर अनोख्या डिझाईनचा शूज, व्हिडीओ पाहून सर्वच आश्चर्यचकित!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें