महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला

महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे.

महाविकास आघाडीचे किती आमदार नाराज?; बावनकुळेंनी आकडाच सांगितला
ओबीसी आरक्षणासाठीचा नवा कायदा ही सरकारची नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 3:53 PM

शिर्डी: महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार सरकारवर नाराज आहेत. मुख्यमंत्री भेटत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याचा फटका बसू नये म्हणूनच सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमात बदल करावे लागले, असा दावा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे आज साई दरबारी आले होते. साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यसरकारला कायदा आणण्याची गरज का पडली..? गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही..? जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज आहेत. 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील… त्यांची कामे होत नसतील तर काय होणार? असा सवाल बावनकुळे यांनी केला.

राज्यपाल चुकीचं पत्रं देणार नाहीत

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रावरही भाष्य केलं. राज्यपाल चुकीचं पत्र सरकारला देणार नाहीत. या सरकारमध्ये खरच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असे आव्हानच बावनकुळे यांनी सरकारला दिलं.

ऊर्जा मंत्र्यांना प्रशिक्षणाची गरज

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. राज्याच्या ऊर्जा मंत्र्याला प्रशिक्षणाची गरज आहे. तसं असेल तर मी त्यांना एक दिवसाचं प्रशिक्षण द्यायला तयार आहे. फडणवीस सरकारने 28 हजार कोटींची वीज दिली होती. ही वीज देताना एकही कनेक्शन कापल गेलं नाही. भाजप सरकार जाताना तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या, असं सांगतानाच पुन्हा भाजप सरकार आलं तर पाच वर्षे वीज न कापता शेतकऱ्यांना वीज देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सरकारचा दोन वर्ष टाइमपास

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरलं. सर्वोच्च न्यायालयाचे दोन वर्षात दोनदा आदेश आलेत. दोन वर्षे यांनी टाईमपास केला. काही लोकांना या जागा बळकावून धनदांडग्यांना देण्याची तयारी केलीय. आधीचा डेटा तयार करण्यासाठी निधी का दिला नाही?, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवार भाजपसोबत? 12 महिने कुणाला बाहेर न बसवण्याचं वक्तव्य

ST Strike|विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; नाशिकमधील 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

VIDEO: अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी आमदारांना फटकारले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.