AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्राईम सिरियल पाहून हत्येचा कट रचला, औषधांचा ओव्हरडोस देऊन पती आणि सासऱ्याला संपवले; महिलेने असे का केले?

सपनाचे कृष्णा नगर येथील रहिवासी राजू गुप्ता याच्याशी प्रेमसंबंध होते. सपनाला पतीपासून सुटका मिळवायची होती. मात्र त्यासोबतच तिचा पतीच्या संपत्तीवरही डोळा होता.

क्राईम सिरियल पाहून हत्येचा कट रचला, औषधांचा ओव्हरडोस देऊन पती आणि सासऱ्याला संपवले; महिलेने असे का केले?
संपत्तीसाठी पती आणि सासऱ्याला संपवलेImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Dec 12, 2022 | 7:16 PM
Share

कानपूर : अनैतिक संबंध आणि संपत्तीच्या हव्यासातून पत्नीने पतीसह सासऱ्याला औषधांचा ओव्हरडोस देऊन संपवल्याची धक्कदायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकरासह चौघांना अटक केली आहे. सपना असे आरोपी महिलेचे तर राजू गुप्ता असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. विशेष म्हणजे क्राईम सिरियल पाहून महिलेला ही हत्येची आयडिया सुचली. याआधीही महिलेच्या प्रियकराने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला होता. मात्र सुदैवाने तो यातून बचावला होता.

काय आहे प्रकरण?

सपनाचे कृष्णा नगर येथील रहिवासी राजू गुप्ता याच्याशी प्रेमसंबंध होते. सपनाला पतीपासून सुटका मिळवायची होती. मात्र त्यासोबतच तिचा पतीच्या संपत्तीवरही डोळा होता. सपनाचा पती ऋषभच्या नावे अनेक प्रॉपर्टी आहेत.

राजूने आधी ऋषभवर जीवघेणा हल्ला घडवून आणला होता. मात्र ऋषभ यातून बचावला. त्यानंतर सपना त्याला औषधांचा ओव्हरडोस देत होती. यामुळे त्याची तब्येत बिघडत गेली आणि त्याचा मृत्यू झाला.

पतीवरील हल्ल्याचा शेजाऱ्यावर आळ घेतला

सपनाचे शेजारी राहणाऱ्या विश्वकर्मासोबत पैशांच्या व्यवहारातून वाद होते. यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आणि आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी सपनाने ऋषभवरील हल्ल्याला विश्वकर्मा जबाबदार असल्याचे पोलिसांना सांगितले होते.

औषधे पुरवणारा मेडिकल स्टोरवालाही अटक

सपनाला औषधे देणाऱ्या मेडिकल स्टोरवाल्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र प्रिस्क्रिप्शन पाहूनच सपनाला औषध दिल्याचा दावा मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.

Follow Us
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा