
लग्न एकाशी पण प्रेम दुसऱ्यावर आणि मग त्यातूनच कधीतरी सुरू होता खून खेळ… लव्ह ट्रँगलमुळे जीव गेल्याच्या अनेक बातम्य आपण वाचल्या असतील. पण बिहारच्या पाटणा येथील फुलवारीशरीफमध्ये जे झालं त्याने तर संपूर्ण गावातच खळबळ माजली ना राव ! एक विवाहीत महिला सकाळी उठून तिच्या दीराला उठवायला त्याच्या खोलीत गेली, पण तिच्या किंकाळीने त्यांचं घरंच नव्हे अख्ख गाव हादरलं. महिलेने जे समोर दृश्य पाहिल, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. असं नेमकं झालं तरी काय ?
वर नमूद केल्याप्रमाणे पाटणाच्या फुलवारीशरीफ मधली ही घटना आहे. तेथे एका युवकाची त्याच्या राहत्या घरातच हत्या झाली. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेस त्याच्य खोलीत घुसून त्याच्या वहिनीनेच त्याची हत्या केली आणि ती फरार झाली. त्या तरूणाची मोठी वहिनी जेव्हा त्याला उठवायला खोलीत गेली, तेव्हा तिला तो युवक रक्तबंबाळ अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला. तिची किंकाळी ऐकून घरातल्या सर्वांनीच तिथे धाव घेतली आणि तेव्हच सर्वांना समजलं की छोट्या सूनेने त्याचा खून केला असून ती फरार झाली.
शोकाकुल परिवारातील सदस्यांनी कसंबसं पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. सध्या आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. हे प्रकरण भुसौला दानापूर परिसरातील आहे. शनिवारी रात्री कौटुंबिक वादातून 24 वर्षीय रिजवान कुरेशीची हत्या करण्यात आली. मृताच्या मधल्या वहिनीवर खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. मृत इसम हा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत झोपलेला असताना, वहिनीने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
खून करून फरार
आणि हत्येनंतर ती महिला फरार झाली. कुटुंबियांच्या सांगण्यानुसार, (मृत) रिझवान त्याच्या खोलीत झोपला होता. रात्रीच्या सुमारास, त्याचा मोठा भाऊ शाहबाज कुरेशीची पत्नी शबनमने त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याची हत्या केली. सकाळी, मोठी वहिनी तिच्या दीराला उठवण्यासाठी गेली. तिने खोलीच्या बाहेरून हाक मारली पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती आत गेली. खोलीचा दिवा लावल्यावर तिला दीर रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेला आढळला. ते पाहून तिने जोरात किंकाळी फोडली, आवाज एकून कुटुंबीय तिथे जमले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
फुलवारीशरीफ पोलीस ठाण्याचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले आणि एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले. तपासानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. कौटुंबिक वादामुळे ही हत्या झाली असावी असं पोलिसांनी सांगितलं.
दीर-वहिनीचं होतं अफेअर
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रिझवानचे एका वर्षापूर्वी लग्न झालं होतं. सध्या त्याची पत्नी तिच्या आईवडिलांच्या घरी गेली होती. रिझवान अविवाहित असताना, त्याचे त्याच्या वहिनीशी, शबनमशी प्रेमसंबंध होते. जेव्हा रिझवानचे लग्न होणार होते तेव्हा दोघांनीही एकत्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना थांबवण्यात आले. लग्नानंतर रिझवान फक्त त्याच्या पत्नीवरच प्रेम करत होता. पण शबनम हे सर्व सहन करू शकत नव्हती. तिला रिझवानसोबत राहायचे होते.
नकार मिळाल्यावर हत्या
शबनमने रिझवानसोबत राहण्याचा हट्ट केला, पण तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. मात्र रिझवानची पत् जेव्हानी तिच्या माहेरी गेली तेव्हा रागात असलेल्या शबनमने रिझवानची हत्या केली. इतकेच नाही तर तिच्या दीराला मारण्यापूर्वी तिने तिच्या पतीच्या बेडरूमच्या दाराला कडी लावून त्याला खोलीत बंद केले होते. वहिनीनेच दीराची हत्या केल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून गावातही दहसत पसरली आहे. रिझवानच्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रूंना तर खळच नाही. पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत असून तपास सुरू आहे.