गोरी गोरीपान, काळीज चिरणारं हास्य… दोन तरुण तिच्यावर भाळले, अन् नंतर जे घडलं त्याने… त्या दोघांबाबत असं काय घडलं?; कोण होती ती?

तिच्या सौंदर्यावर फिदा झाले, पण त्या गोऱ्या रंगाने दोन तरुणांचा घात केला... काळीज चिरणारं हास्यावर भाळले आणि त्यानंतर जे काही घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं... कोण होती 'ती...'

गोरी गोरीपान, काळीज चिरणारं हास्य... दोन तरुण तिच्यावर भाळले, अन् नंतर जे घडलं त्याने... त्या दोघांबाबत असं काय घडलं?; कोण होती ती?
फाईल फोटो
| Updated on: Aug 24, 2025 | 12:57 PM

प्रेमात तरुणीची फसवणूक झाली, तिच्यावर अन्याय करण्यात आले… अशा अनेक घटना आपण ऐकत असतो, पाहत असतो… पण आता तर एका तरुणीने दोन तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे… तिच्या सौंदर्यावर फिदा झालेले हे दोन तरुण आज मोठ्या अडचणीत अडकले आहे. ही घटना आहे मध्य प्रदेशातील खंडवा येथील… तरुणीने दोन तरूणांना हिनीट्रॅपमध्ये फसवलं आणि त्यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तरुणीने दोघांकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळले… तक्रार दाखल झाल्यानंतर मोघट पोलिसांना तरुणी विरोधात तक्रार दाखल केली असून शोध कार्य सुरु आहे.

सांगायचं झालं तर, खंडवा येथे राहणारा एहतेशान खान याने मोघट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. एहतेशान याची पत्नी निखत हाश्मी त्याला सतत पोलिसांत तक्रार करेल म्हणत धमकवत होती. पैशांसाठी देखील निखत हिने अनेकदा एहतेशान याला धमकावलं असल्याची माहिती समोर येत आहे… एवढंच नाही तर, तिने अनेकदा त्याच्याकडून मोठी रक्कम देखील घेतली आहे…

एहतेशान याने दिलेल्या माहितीनुसार, निखत हिने 4 वर्षांपूर्वी एहतेशान याला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवत मैत्री केली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर निखत फक्त 17 दिवस पतीच्या घरात राहिली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी तिने एहतेशान याच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. 18 व्या दिवशी निखत घरातील दागिने घेवून फरार झाली. सोने – चांदी आणि सात लाख घेवून निखत पळून गेली…

स्वतःसोबत घडलेली घटना सांगत एहतेशान यांने आणखी एक मोठा खुलासा केला. निखत हिने कोलकाता येथील ज्वेलरी उद्योजकाची देखील फसवणूक केली आहे… उर्वशी अग्रवाल नावाच्या एका व्यापारासोबत तिने मैत्री केली आणि त्यानंतर नरगिस बणून त्याच्यासोबत लग्न केलं..

सर्वात आधी एहतेशामला फसवलं…

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर, मुलीने तरुण व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये लुटले आणि कोलकातामधून देखील गायब झाली. मुलीकडे दोन नावांनी बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रं देखील होती. एहतेशाम याने सांगितल्यानुसार, एक मित्राच्या माध्यमातून निखत हिच्यासोबत ओळख झाली. निखत इंदूरमध्ये एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. तिने तिच्या आईच्या उपचाराच्या नावाखाली तर कधी तिच्या भावंडांच्या शिक्षणाच्या नावाखाली माझ्याकडून 22 लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्नानंतर ती 17 दिवस घरीच राहिली, पण 18 व्या दिवशी ती 5 लाख रुपयांचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख घेऊन घरातून निघून गेली.

कोलकाता येथील व्यावसायिकाला देखील लूटलं…

एहतेशान याच्यानंतर तरुणीने कोलकाता येथील व्यावसायिकाला देखील लूटलं… ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. पोलिसांनी कोलकाता येथील तरुणाचा जबाबही नोंदवला. या घटनेबाबत खंडवाचे शहर एसपी अभिनव बरंगे म्हणाले की, एहतेशामच्या तक्रारीवरून त्याची पत्नी निखतविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलकाता येथील तरुणाने देखील जबाबात म्हटलं आहे की, त्याचीही फसवणूक झाली आहे. त्याची 2 ते 3 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस महिला आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात लवकरच महिलेला अटक केली जाईल… असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.