AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 दिवस बेवारस होता अभिनेत्रीचा मृतदेह, अनेकांच्या मनावर केलं राज्य पण शेवट अत्यंत हृदयद्रावक

Actress Life: 3 दिवस बेवारस होता अभिनेत्रीचा मृतदेह..., 'त्या' दिवशी अचानक पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि धक्कादायक दृष्य समोर आलं... अत्यंत हृदयद्रावक होता अभिनेत्रीचा अंत...

3 दिवस बेवारस होता अभिनेत्रीचा मृतदेह, अनेकांच्या मनावर केलं राज्य पण शेवट अत्यंत हृदयद्रावक
फाईल फोटो
| Updated on: Aug 24, 2025 | 11:41 AM
Share

Actress Life: आयुष्यात कधी काय होईल काही सांगता येत नाही. आज आनंदी आणि उत्साही दिसणारा व्यक्ती पुढच्या क्षणाला दिसणार की नाही हे देखील सांगता येत नाही… असंच काही हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत झालं आहे. 22 डिसेंबर 2010 चेंबूरच्या युनियन पार्कमध्ये अचानक पोलिसांचा सायरन वाजला… गाडीतून पोलीस उतरले आणि एका बंगल्याचा दरवाजा तोडण्यास त्यांनी सुरुवात केली. जेव्हा पोलीस बंगल्यात गेले तेव्हा एक मृतदेह 3 दिवसांपासून अंत्यसंस्कारच्या प्रतिक्षेत होता… मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून बॉलिवूडची सुपरहिट अभिनेत्री नलिनी जयवंत यांचं होतं. एक काळ असा होता जेव्हा नलिनी हिने हिंदी सिनेविश्वावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं…

18 फेब्रुवारी 1926 मध्ये मुंबईतील एका साध्या घरात नलिनी यांच्या जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना डान्सची प्रचंड आवड होती. वयाच्या 14 व्या वर्षी नलिनी यांनी ‘बहन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी अनेक दिग्गज आणि लोकप्रिय सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. देवानंद, भारत भूषण आणि दिलीप कुमार यांसारख्या अभिनेत्यासोबत नलिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं…

नलिनी यांनी त्यांच्या करीयरमध्ये 70 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. काला पानी, मुनीमजी, जादू, नास्तिक आणि मिलन यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. नलिनी सिनेविश्वात यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला.

नलिनी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक विरेंद्र देसाई यांच्यासोबत नलिनी यांनी लग्न केलं. पण कुटुंबियांनी दोघांच्या नात्याचा स्वीकार केला नाही… अखेर लग्न मोडल्यानंतर नलिनी यांनी पुन्हा सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली… यादरम्यान, नलिनी यांचं नाव अशोक कुमार यांच्यासोबत जोडलं जाऊ लागलं…

पण नवऱ्याच्या निधनानंतर नलिनी पूर्णपणे एकट्या पडल्या… अभिनेत्रीने स्वतःला समाजापासून वेगळं केलं आणि एकटी जीवन जगू लागली. तिचं शेवटचं वर्ष अतिशय कठीण परिस्थितीत गेलं. 2010 मध्ये तिचं निधन झालं, परंतु तीन दिवसांपर्यंत कोणालाही त्याबद्दल माहिती नव्हती. जेव्हा लोकांना कळलं की अभिनेत्रीचा मृतदेह एका दूरच्या नातेवाईकाने नेला आणि गुपचूप अंत्यसंस्कार केले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यावेळी अभिनेत्रीचे शेजारी, नातेवाईक किंवा चित्रपट जगतातील कोणीही त्यांच्यासोबत उपस्थित नव्हते.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.