सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवले, 20 वर्षांच्या पोरांचा प्रताप, पोलिसांकडून शोध सुरु

| Updated on: Sep 25, 2021 | 10:16 AM

दुपारच्या वेळेत पुरुष मंडळी घरी नसल्याचे हेरुन दोन भामटयांनी दागिने चमकविण्याच्या नावावर महिलांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना भंडारा तालुक्याच्या भिलेवाडा येथे घडली आहे.

सोनं पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवले, 20 वर्षांच्या पोरांचा प्रताप, पोलिसांकडून शोध सुरु
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला
Follow us on

तेजस मोहतुरे, भंडारा : कोणी अनोळखी इसम सेल्समेन बनून तांबे, चांदी,सोने चमकविन्याचे प्रोडक्ट घेऊन आला तर सावधान… सोने चमकविन्याची भूरळ पडू शकते भारी… होय दुपारच्या वेळेत पुरुष मंडळी घरी नसल्याचे हेरुन दोन भामटयांनी दागिने चमकविण्याच्या नावावर महिलांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना भंडारा तालुक्याच्या भिलेवाडा येथे घडली आहे. यात सेल्समन बनून आलेल्या 20 ते 21 वयोगटातील भामटयांनी 18 हजार रुपयांचे सोने पळवून नेले आहे. या प्रकरणी कारधा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सेलमन्स बनून आले, दागिने घेऊन गेले

भिलेवाडा येथील सुरभी संदीप गाढवे यांच्या घरी दुपारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण सेलमन्स बनून आले. आपण तांबे, चांदी,सोने चमकविण्याचे प्रोडक्ट घेऊन आलो असल्याची बतावणी करुन सुरुवातीला तांबे, पितळीचे दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांनी महिलांना बोलण्यात गुंतवलं. महिलांनीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपले दागिने भामट्यांच्या हवाली केले.

उकळत्या पाण्यात दागिने साफ करतो, महिलांची दिशाभूल, सोने घेऊन फरार

सोन्याची गळसोरी, एक डोरले, सोन्याचे छोटे मनी तसंच विविध प्रकारचे सोन्याचे दागिने महिलांनी भामट्यांकडे हवाली केले. गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देतो असे सांगून मोठ्या चलाखीने गॅसवरील भांडयात दागिने ठेवल्याचे भासवून ह्या दोन आरोपींनी तिथून पळ काढला.

पोलिसांत गुन्हा नोंद

काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यावर घरचे पुरुष मंडळी आल्यावर संबधित प्रकार उघडीस आला असून उशिरा कारधा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे. या घटनेनंतर कोणी अनोळखी व्यक्ती दागिने साफ करण्याची बतावणी करत असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे.

(Women Cheating in Bhandara bhilewada stolen Gold Jewelry)

हे ही वाचा :

हाफ चिकन फ्राईड राईस महागात, चायनीज खाल्ल्याने विषबाधा, 6 मुलं रुग्णालयात

नाशिकमध्ये ज्वेलर्समधील लुटालूट थांबेना, आता भरदिवसा डल्ला, 7 लाखांचे दागिने हातोहात लांबवले