Crime News: बिर्याणीवाल्यासाठी पागल झाली… त्यानंतर एकामागून एक… दूध, झोपेची गोळी आणि उशी… काय घडलं त्या चार भिंतीत?
एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पती आणि मुलांच्या हत्येचा कट रचला होता, यात ती यशस्वीही झाली. आता तिला आणि तिच्या प्रियकराला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

विवाहित महिला परपुरूषाच्या प्रेमात पडतात आणि पतीचा किंवा मुलांचा जीव घेतात अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. तामिळनाडूत अशीच एक घटना 2018 साली घडली होती. यात एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पती आणि मुलांच्या हत्येचा कट रचला होता, यात ती यशस्वीही झाली. आता तिला आणि तिच्या प्रियकराला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अबीरामी ही महिला पती आणि मुलांसह तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहत होती. तिचा पती बँकेत काम करत होता, तिला सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी अशी दोन अपत्ये होती. अबिरामीला टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्याची आणि बिर्याणी खाण्याची आवड होती. ति जवळच्या एका प्रसिद्ध बिर्याणी स्टॉलवरून बिर्याणी ऑर्डर करत असे.
अबीरामी बिर्याणीवाल्याच्या प्रेमात पडली
या बिर्याणी स्टॉलवर मीनाची सुंदरम हा तरुण काम करत असे. तो अनेकदा अबीरामीच्या घरी बिर्याणी देण्यासाठी यायचा. त्यामुळे या दोघांमध्ये कालांतराने मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेम झाले. काही काळानंतर अबीरामी सुंदरमच्या प्रेमात आंधळी झाली. ती हेही विसरली की, आपण विवाहित आहे आणि आपल्याला दोन मुले आहेत. तिला असे वाटले की, नवरा आणि मुले प्रेमात अडथळा आणत आहेत.
नवरा आणि मुलांच्या हत्येचा कट
अबीरामी आणि सुंदरम यांच्या प्रेमाबद्दल पती विजयला समजले. त्याने अबीरामीला सुंदरमला भेटू नको असे बजावले. दोन्ही कुटुंबांनीही अबीरामीला प्रेमातून बाहेर पडण्यास सांगितले. मात्र हे दोघे प्रेमात पागल झाले होते, त्यांनी नवरा आणि मुलांचा काटा काढायचे ठरवले.
दुधातून दिल्या झोपेच्या गोळ्या
सुंदरमने अबीरामीकडे झोपेच्या गोळ्या दिल्या. मुलांना आणि नंतर पतीला झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस देऊन त्यांना संपवायचे अशी योजना होती. अबीरामीने मुलांच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तिची मुलगी दूध प्यायली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र तिचा सात वर्षांचा मुलगा पती वाचले. दुसऱ्या दिवशी सकाळी पती ऑफिसमध्ये गेला. त्यानंतर अबीरामीने मुलाचा चेहरा उशीने दाबला आणि त्याचा जीव घेतला.
यानंतर अबीरामी आणि सुंदरमने कन्याकुमारीला पळून जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी पती घरी आला तेव्हा त्याला आपल्या मुलांचे मृतदेह दिसले. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास करत लवकरच अबीरामी आणि सुंदरमला अटक केली. त्यांनी गुन्हे कबूल केले. आता 24 जुलै रोजी न्यायालयाने अबिरामी आणि सुंदरम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावसी आहे.
