AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, जय महेश कारखान्यातील धक्कादायक घटना

पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास टोले हे बॉयलरजवळ दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी बॉयलरच्या पट्ट्यात अडकल्याने टोले यांचा जागीच मृत्यू झाला.

बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू, जय महेश कारखान्यातील धक्कादायक घटना
बीडमध्ये बॉयलरच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यूImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 22, 2023 | 5:32 PM
Share

बीड / महेंद्र मुधोळकर (प्रतिनिधी) : दुरुस्तीचे काम करत असताना बॉयलरच्या पट्टयात अडकून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखान्यामध्ये मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. कल्याण गणपती टोले असे मयत 40 वर्षीय कामगाराचे नाव असून, तो आनंदगाव येथील रहिवाशी आहे. टोले हे तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) कामगार म्हणून कामाला होते. या घटनेमुळे टोले यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुरुस्तीचे काम सुरु असताना घडली दुर्घटना

पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास टोले हे बॉयलरजवळ दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी बॉयलरच्या पट्ट्यात अडकल्याने टोले यांचा जागीच मृत्यू झाला. मयत टोले यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत अद्याप पोलीस कारवाईची प्रक्रिया चालू आहे. मयत कल्याण टोले यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. आनंदगावमध्ये आठ दिवसात तरुणाचा हा दुसरा अपघाती मृत्यू असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

भंडाऱ्यात मळणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा मृत्यू

शेतातील उडीद पिकाची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात साडी अडकल्याने महिलेचा गुरफटून मृत्यू झाल्याची दर्दैवी घटना भंडाऱ्यात घडली. लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे ही घटना घडली. शीतल धर्मशील कोचे असे मृत्यू झालेल्या 52 वर्षीय महिलेचे नाव आहे. शीतल यांच्या स्वतःच्या शेतातील उडीद पिकाची मळणी करण्यासाठी रुपचंद बगमारे यांची ट्रॅक्टरसह मळणी यंत्र सुरू होते. यावेळी शीतल मळणी यंत्र आणि ट्रॅक्टरच्या मधोमध उभी असताना त्यांची साडी लोखंडी सॉफ्टिंगला अडकून त्यात गुरफटल्याने शितल यांचा जागीच मृत्यू झाला.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे.

IMD weather update : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 48 तास धोक्याचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर जमा व्हा, राहुल गांधी यांचं देशवासियांना आवाहन

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर….

‘आंदोलक आतंकवादी’, त्या विधानावर सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, म्हणाले मी तर…

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल….

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…