Pune Crime | महिलांचे फोटो अश्लिल स्वरुपात व्हायरल करणाऱ्यास बेड्या, महिला आयोगाने पुणे पोलिसांना मागवला अहवाल

महिला व मुलींचे फोटो (Womens Photo) काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलिसांनी एका 25 वर्षी आरोपीस अटक केले आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या फोटोंमध्ये हा तरुण छेडछाड करायचा.

Pune Crime | महिलांचे फोटो अश्लिल स्वरुपात व्हायरल करणाऱ्यास बेड्या, महिला आयोगाने पुणे पोलिसांना मागवला अहवाल
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 2:28 PM

पुणे : महिला व मुलींचे फोटो (Womens Photo) काढत ते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलिसांनी एका 25 वर्षी आरोपीस अटक केले आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या फोटोंमध्ये हा तरुण छेडछाड करायचा. आरोपीकडून अशा प्रकारे विकृत काम करण्यात येत असल्याचे समजताच पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या बुली बाई आणि सुल्ली डील हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात (Pune Crime) महिलांचे फोटो नग्न महिलांच्या फोटोवर लावण्याच्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडकी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील खडकी या भागात राहणारा एका 25 वर्षीय तरुण महिला तसेच मुलींच्या फोटोंसोबत छेडछाड करायचा. त्याने वस्तीत राहणाऱ्या महिलांचे फोटो काढले होते. नंतर हेच फोटो त्याने नग्न महिलांच्या फोटोवर लावले. विशेष म्हणजे हे फोटो त्याने सोशल मीडियावर व्हायरलदेखील केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केलं आहे. 2019 पासून हा तरुण अशा प्रकारे महिलांचे फोटो व्हायरल करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

महिला आयोगाने मागवला अहवाल

वस्तीत राहणाऱ्या महिलांचो फोटो काढून ते अश्लिल स्वरुपात तयार केले आहेत. हा प्रकार गंभीर असून त्याची आपल्या स्तरावर चौकशी करावी. तसेच आपण केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोग कार्यालयास तत्काळ पाठवावा, असे निर्देश महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

बुलीबाई प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास 

दरम्यान, दुसरीकडे बुलीबाई आणि सुल्ली डील हे प्रकरण देशभर गाजत आहे. बुलीबाई आणि सुल्ली डील या अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो टाकून त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अगोदर बंगळुरु येथून 21 वर्षीय इंजिनिअर तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलं होतं. नंतर 18 वर्षाची श्वेता सिंग या तरुणीचे नाव समोर आले होते. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Palghar Crime | कोरोना झाल्याने रुग्णालयात उपचार, पोलिसांचा पहारा भेदून पालघरमधील आरोपी फरार, पळ कसा काढला ?

भंडाऱ्यात चाललंय काय? पती-पत्नीचा वाद; दोघांनीही रॉकेल ओतून पेटवून घेतले, चिमुकल्याचा वाली कोण?

Nagpur Crime | सासूसोबत झाला वाद, मुलाला विष पाजून स्वतःही घेतले; दीड वर्षीय बाळाचा मृत्यू..

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.