AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीची छेड काढणाऱ्याला बेदम चोपलं, आरोपीच्या निष्पाप भावावर अत्याचार, व्हिडीओ बनवून थेट पोलिसांना आव्हान

बहिणीची छेड काढली म्हणून एका भावाने त्याच्या मित्रांच्या मदतीने छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर छेड काढणाऱ्याच्या भावाचा काही दोष नसताना त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला (youth beat accused who molest his sister in Dombivali)

बहिणीची छेड काढणाऱ्याला बेदम चोपलं, आरोपीच्या निष्पाप भावावर अत्याचार, व्हिडीओ बनवून थेट पोलिसांना आव्हान
बहिणीची छेड काढली म्हणून विकृतपणा, आरोपीच्या निष्पाप भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न, व्हिडीओ बनवून थेट पोलिसांना आव्हान
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 11:48 AM
Share

डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. बहिणीची छेड काढली म्हणून एका भावाने त्याच्या मित्रांच्या मदतीने छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर छेड काढणाऱ्याच्या भावाचा काही दोष नसताना त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित प्रकार पोलिसात गेला. मारहाण करणारा पीडित मुलीचा भाऊ मित्रांसह फरार झाला. त्यानंतर त्यांची मुजोरी इतकी की, त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ बनवून थेट पोलिसांना आव्हान दिलं (youth beat accused who molest his sister in Dombivali).

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत आयरे रोड परिसरात एका 13 वर्षीय मुलीची छेड काढण्याचा आरोप या परिसरातील राहणाऱ्या राजू सोनार या तरुणावर आहे. रामनगर पोलीस ठाण्यात राजू सोनारच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला. मात्र ज्या मुलीची छेड काढली गेली तिचा भाऊ रोहित धोत्रे याने त्याच्या काही साथीदारांसोबत छेड काढणाऱ्या राजू सोनार याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल सुद्धा झाला आहे.

रोहित धोत्रे आणि त्याचे साथीदार मारहाण करुन थांबले नाही तर त्यांनी राजू याचा भाऊ राहूल याला इतकी मारहाण केली, त्याचे कसेबसे प्राण वाचले. मारहाण करुन रोहित धोत्रे, विकास नवले आणि ओमकार हे तिघे फरार झाले होते. पोलीस त्यांना शोधत होते. या दरम्यान त्यांचा पोलिसांना आव्हान देणारा एक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला. या व्हिडीओत दोन जण पोलिसांना आव्हान देत होते.

आरोपींनी नेमका काय व्हिडीओ बनवला?

तुमच्याकडे वॉरंट आहेत का, तुम्ही चिडिया घरात आहात का, असे सवाल करत आरोपी पोलिसांची खिल्ली उडवताना दिसत होते. अखेर रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर, गुन्हे पोलिस निरिक्षक समशेर तडवी आणि पोलीस अधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या पथकाने या विरोधात कडक कारवाई करण्याचं ठरवलं. आरोपी डोंबिवलीत दशहत माजविण्याच्या प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना शोधून काढलं. आता त्या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

“एखादा व्यक्ती गुन्हा करतो तर काही लोक कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देतात. त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. समजा त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांची चूक नाही, असं समजू. पण आरोपींनी गुन्हा केल्यानंतर पोलिसांना आव्हान देणारा व्हिडीओ तयार केला. यातूनच त्यांची मुजोरी दिसून येते. त्यामुळे त्यांना पोलिसांचा खाक्या दाखवण्यात आला”, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी शमशेर तडवी यांनी दिली.

हेही वाचा : पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.