अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

दोन मित्रांमध्ये अवघ्या 400 रुपयांसाठी हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे (youth death after fighting with friend over 400 rupees)

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद
| Updated on: Feb 02, 2021 | 11:42 PM

कल्याण (ठाणे) : दोन मित्रांमध्ये अवघ्या 400 रुपयांसाठी हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एका मित्राचा विद्यूत खांब्यावर आदळल्याने दुर्देवी मृत्यू झाला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा सर्व प्रकार उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमध्ये साईनाथनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला घडला (youth death after fighting with friend over 400 rupees).

उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमध्ये साईनाथनगर परिसरात फईम शेख आणि सोनू गुप्ता हे दोघे मित्र वास्तव्यास होते. ते दोघं एकाच जीन्स कंपनीत कामाला होते. फहिमने सोनूकडून 400 रुपये उसने घेतले होते. बरेच दिवस झाले तरी फहिमने पैसे दिले नाहीत म्हणून सोनूने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. या दोघांच्या वादात काही नागरिकांनी मध्यस्ती केली. मात्र दोघांमध्ये हाणामारी सुरूच होती. या हाणामारीत सोनूने फईम शेखला धक्का दिल्याने तो विजेच्या खांब्यावर आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी हिललाईन पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे (youth death after fighting with friend over 400 rupees).

हेही वाचा : सांगलीत मंडल अधिकारी आणि तलाठीत जुंपली, कपडे फाटेपर्यंत झटापटी