सांगलीत मंडल अधिकारी आणि तलाठीत जुंपली, कपडे फाटेपर्यंत झटापटी

इस्लामापुरात सध्या प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांच्या झटापटीची चांगलीच चर्चा रंगली आहे (Fight between two officers in Islampur Tahsil office)

सांगलीत मंडल अधिकारी आणि तलाठीत जुंपली, कपडे फाटेपर्यंत झटापटी
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 10:49 PM

सांगली : इस्लामापुरात सध्या प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांच्या झटापटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. इस्लामपूर तहसील कार्यालयात एक मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. ही झटापट इतकी भयानक झाली की, त्यांनी एकमेकांचे कपडेदेखील फाडले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत छोट्या-मोठ्या कारणावरुन शाब्दिक वाद व्हायचा. या वादाचा फुगा थेट आज संध्याकाळी तहसील कार्यालयात फुटला. त्यांच्या या टोकाच्या वादाने परिसीमा गाटत ते थेट तहसील कार्यालयातच महिला नायब तहसीलदारांसमोर भिडले (Fight between two officers in Islampur Tahsil office).

इस्लामपूरच्या उरुण येथील तलाठी कार्यालयात कैलास कोळेकर हे मंडल अधिकारी आहेत. तर अशोक लोनिष्टे हे तलाठी म्हणून काम पाहतात. या दोघी अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या नेमणुकीपासूनच सतत वाद सुरु होता. कधी नोंदीवरुन त्यांच्यात खटके उडायचे तर कधी अन्य काही कारणावरुन त्यांच्यात वाद व्हायचा. या दोघांच्या भांडणाचा किस्सा तालुका महसूल विभागात चांगलाच चर्चेत आहे. मात्र, या वादाने आता थेट परिसीमा गाठली.

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यात मंगळवारी (2 फेब्रुवारी) रात्री पुन्हा वाद झाला. ते दोघे एकमेकांना भिडले. महिला नायब तहसीलदारांच्या समोरच ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामध्ये त्यांचे कपडेही फाटले. त्यांच्या काही सहकाऱ्यांनी हे भांडण मिटवलं. मात्र तहसील कार्यालयातच झालेल्या दोन शासकीय कर्मचाऱ्यांच्या या भांडणामुळे चांगलीच खळखळ माजली.

या प्रकरणी दोघी अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. दोघांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणी दोघांवर प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल (Fight between two officers in Islampur Tahsil office).

हेही वाचा : …आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले! 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.