AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hit & Run case : मुंबईत पुन्हा हिट अँड रन, अल्पवयीन आरोपीने SUV ने एकाला चिरडलं; दुर्दैवी मृत्यूमुळे खळबळ

मुंबईत एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एसयूव्ही चालवत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला चिरडले. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.अपघातानंतर जखमीला तसेच सोडून पळून गेलेल्या एसयूव्ही चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी दोघांना आरोपी करण्यात आले आहे.

Hit & Run case :  मुंबईत पुन्हा हिट अँड रन, अल्पवयीन आरोपीने SUV ने एकाला चिरडलं; दुर्दैवी मृत्यूमुळे खळबळ
| Updated on: Aug 30, 2024 | 9:05 AM
Share

पुण्यातील पोर्श कार अपघाताची पुनरावृत्ती राज्यात झाली आहे. मुंबईत पुन्हा एका हिट अँड रनची घटना उघडकीस आली असून एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने SUV चालवत एकाला चिरडलं. त्यामध्ये दुर्दैवी तरूणाचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात झाल्यानतंर कारचालक तेथून फरार झाला. अखेर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला अटक केली असून याप्रकरणी आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातवेळी ते दोघे जण आरोपीसाह कारमध्येच होते अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात हा अपघात झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अखेर अटक केली आहे. नवीन वैष्णव असे मृताचे नाव असून तो अवघ्या 24 वर्षांचा होता. पहाटे दूध पोहोचवण्याचे काम करणाऱ्या नवीनला हिट अँड रनमुळे नाहक जीव गमवावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी एका 24 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओने (एसयूव्ही) धडक दिली. या अपघाता तरूण जखमी होऊन खाली कोसळला, मात्र त्याला मदत करणं सोडून कारचालकाने तेथून पळ काढला. स्थानिकांनी त्या जखमी तरूणाला उपचारांसाठी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आणि अपघातग्रस्त कारही ताब्यात घेतली.

अपघातानंतरर SUVची खांबाला धडक

रिपोर्ट्सनुसार, त्या दुचाकीस्वाराला चिरडल्यानंतर ती एसयूव्ही कार एका विजेच्या खांबालाही धडकली, ज्यामुळे अल्पवयीन चालक किरकोळ जखमी झाला. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले.

दूधवाटप करण्यासाठी जात होता तरूण

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वैष्णव ( वय 24) हा बाईकवर बसून गोरेगाव परिसरात दूध वाटप करत होता. आरे कॉलनीत पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. तर या अपघातास आणि तरूणाच्या मृत्यूस जबाबादार ठरलेल्या आरोपी चालकाचे वय अवघे 17 वर्षं आहे. अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिलीच कशी असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एसयूव्ही मालक इक्बाल जिवानी (48) आणि त्याचा मुलगा मोहम्मद फैज इक्बाल जिवानी (21) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केले होते की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अपघातापूर्वी आरोपीने मित्रांसोबत पार्टी केली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

पुण्यातही काही महिन्यांपूर्वी अशीच दुर्घटना घडली होती. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कार चालवली होती. कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातामध्ये एक तरूण आणि एका तरूणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. तर काही दिवसांपूर्वीच वरळी येथेही हिट अँड रनची दुर्घटना घडली होती, त्यामध्ये एका महिलेला जीव गमवावा लागला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.