AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : बंदुक दाखवताना चुकून ट्रिगर दाबला गेला, पोलिसाच्या बेजबाबदारपणा तरुणाला भोवला

अमृतसर येथील मोबाईल रिपेरिंग दुकानात पंजाब पोलीस दलातील एक कर्मचारी आला. कर्मचाऱ्याने दुकानात आल्यानंतर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून काऊंटरवर ठेवली.

CCTV : बंदुक दाखवताना चुकून ट्रिगर दाबला गेला, पोलिसाच्या बेजबाबदारपणा तरुणाला भोवला
पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून गोळीबारImage Credit source: ANI
| Updated on: Oct 20, 2022 | 4:58 PM
Share

पंजाब : बंदुक दाखवताना पोलीस कर्मचाऱ्याकडून अचानक गोळी सुटल्याची घटना पंजाबमधील अमृतसरमध्ये घडली आहे. या घटनेत मोबाईल दुकानातील तरुण गंभीर जखमी (Youth injured in Firing) झाला आहे. गोळीबाराची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Incident Caught in CCTV) झाली आहे. हा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियात (Video Viral on Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर टीका होत आहेत.

अमृतसरमधील मोबाईल रिपोरिंग दुकानात घडली घटना

अमृतसर येथील मोबाईल रिपेरिंग दुकानात पंजाब पोलीस दलातील एक कर्मचारी आला. कर्मचाऱ्याने दुकानात आल्यानंतर आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून काऊंटरवर ठेवली. रिव्हॉल्वर दुकानातील लोकांना दाखवत होता आणि काऊंटरवर फिरवत होता.

मात्र रिव्हॉल्वर फिरवत असताना कर्मचाऱ्याने अचानक ट्रिगर दाबला आणि बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी दुकानातील एका तरुण कर्मचाऱ्याला लागली. या गोळीबारात कर्मचारी गंभीर जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस कर्मचारी निलंबित

गोळीबार प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे अमृतसरचे नॉर्थ विभागाचे एसपी वरिंदर सिंह यांनी सांगितले.

पोलीस कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ही गोळीबाराची घटना घडली. यात एक तरुण जखमी झाला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अद्याप कळू शकले नाही. तूर्तास या कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून, सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या माहितीवरुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.