Video: चार दोस्तांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, एकाचा पाय सटकला आणि थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. आयुष्यात सुख-दुखाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येकवेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो.

Video: चार दोस्तांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, एकाचा पाय सटकला आणि थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 4:29 PM

लखनऊ : आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरोसा नाही. आयुष्यात सुख-दुखाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येकवेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्देव ! अशा घटना या अनेकदा बघायला मिळतात. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात तशीच घटना बघायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नेमकं प्रकरण काय?

चार मित्र मजा-मस्ती, रिलॅक्स किंवा विरंगुळा म्हणून एका हॉटेलात गेले. तिथे हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पुलमध्ये ते मजा-मस्ती करत होते. पण यावेळी एक तरुण स्विमिंग पुलमधून बाहेर पडला. तो पूलच्या बाजूला असलेल्या भिंतीवर चढला. तो त्याच भिंतीवर पळत पुढे आला. त्यानंतर त्या भिंतीच्या बाजूला असलेल्या भिंतीवर पाय ठेवायला गेला. पण त्या भिंतीवरुन त्याचा पाय सटकला. त्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. या व्हिडीओवर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणाचा मृत्यू

संबंधित घटना ही 18 जुलैला घडली आहे. या दुर्घटनेत तरुणाचा जमिनीवर पडताच जागीच मृत्यू होता. मृतक तरुण हा चौथ्या मजल्यावरुन खाली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडतो. यावेळी तिथे काही माणसं काम करत असतात. तरुण खाली पडल्यावर ते त्याच्याजवळ जातात. त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू होतो.

स्विमिंग पूलच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीच्या उंचीवरुन सवाल

संबंधित घटनेनंतर मृतक मुलाच्या कुटुंबियांनी हॉटेल मालकाच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर काही लोकांनी स्विमिंगल पूलजवळ असलेल्या भिंतीच्या उंचीवरुन सवाल उपस्थित केले आहेत. या भिंतीची उंची जास्त असती तर ही घटना टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया काही जणांनी दिली आहे.

संबंधित घटनेचा थरार व्हिडीओ बघा :

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.