घर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरुन हत्या, तिघांना अटक

घर बळकविण्यासाठी मालकाची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या (Murder of house owner by tenant) करण्यात आली आहे.

घर बळकविण्यासाठी मालकाची गळा चिरुन हत्या, तिघांना अटक

मुंबई : घर बळकविण्यासाठी मालकाची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या (Murder of house owner by tenant) करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडीतील कासमी कंपाऊंड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्याच्या समोर घडली आहे. भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तीन जणांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ (Murder of house owner by tenant) उडाली आहे.

घर मालकाने भाडेकरुंना घरातून बाहेर काढल्याचा राग आल्याने आरोपीने दोन साथीदारांसह संगमत करुन घर मालकाची हत्या केली. या हत्येनंतर भोईवाडा पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली आहे.

रमेश राठोड (वय 28), संजयकुमार हिरजन (वय 25) आणि संजय पवार (वय 35) अशी अटक करण्यात आलेलल्या आरोपींची नावं आहेत. तर तुळशीराम चव्हाण (वय 31) असे निर्घृण हत्या झालेल्या घर मालकाचे नाव आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास भोईवाडा पोलीस करीत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *