दुबईत नोकरीला असल्याचा बनाव, नागपुरातील मुलीशी लग्न, ऑस्ट्रेलियन नागरिकाकडून फसवणूक

दुबईत मिथ्या कंपनीत नोकरीवर असल्याचं सांगत लग्नात लाखोचे दागिने हडपले आणि मोबाईलवरुन ट्रिपल तलाक देत फसवणूक केली.

दुबईत नोकरीला असल्याचा बनाव, नागपुरातील मुलीशी लग्न, ऑस्ट्रेलियन नागरिकाकडून फसवणूक

नागपूर : ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीने मॅट्रिमोनिअल साईटवरुन नागपूरच्या युवतीसोबत (Nagpur Marriage Fraud) लग्न केलं. दुबईत मोठ्या कंपनीत नोकरीवर असल्याचं सांगत लग्नात लाखोचे दागिने हडपले आणि मोबाईलवरुन ट्रिपल तलाक देत फसवणूक केली. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nagpur Marriage Fraud).

हुसेन काखडची नावाचा युवक ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. मात्र, त्याने आपण भारतीय नागरिक असल्याचं सांगत नागपुरातील युवतीसोबत मेट्रिमोनिअल साईटवरुन ओळख केली. तिच्याशी लग्न केलं आणि पुण्याला त्याच्या घरी घेऊन गेला. आपण दुबईमध्ये एका मोठ्या कंपनीत मोठ्या नोकरीवर असल्याचं सांगितलं. युवती चांगल्या परिवारातील असून ती व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे.

लग्नाच्या काही दिवसातच त्याचं बिंग फुटलं. तो ऑस्ट्रेलियन नागरिक असून त्याचं आधीच लग्न झालं आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. ही माहिती मिळताच युवती घाबरली. मात्र, त्याच्या परिवारातील लोकांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिचे सगळे दागिने घेऊन घेतले.

युवतीने नागपुरात येऊन मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवत एवढं मोठं पाऊल उचलणं या युवतीला महागात पडलं.

Nagpur Marriage Fraud

संबंधित बातम्या :

पुण्यात प्रसिद्ध वकिलाचं अपहरण, घाट परिसरात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पेटीएम कंपनीच्या कर्मचाऱ्यानंच ग्राहकाला लावला 50 हजारांचा चुना; सायबर सेलने ठोकल्या बेड्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *