धक्कादायक, पुण्याच्या बायोटेक कंपनीत ड्रग्जचं रॅकेट, 20 कोटींच्या ड्रग्जसह 12 जणांना अटक

पिंपरी-चिंचवडमधील बायोटेक कंपनीतील ड्रग्जच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

धक्कादायक, पुण्याच्या बायोटेक कंपनीत ड्रग्जचं रॅकेट, 20 कोटींच्या ड्रग्जसह 12 जणांना अटक

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील बायोटेक कंपनीतील ड्रग्जच्या रॅकेटचा (Selling Mephedrone Drug) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 20 कोटींच्या ड्रग्जसह आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे (Selling Mephedrone Drug).

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचं कनेक्शन मुंबईपर्यंत पोहोचलं आहे. पण, बॉलिवूडपर्यंत अद्याप पोहचू शकलेलं नाही. याचा मुख्य सूत्रधार तुषार काळे हा मुंबईचा असून तो छोटा राजन गँगशी संबंधित आहे. तर नायजेरियन नागरिक जुबी उकोडोला वसई येथून अटक करण्यात आली.

सुरुवातीला फार्माशी संबंधित 5 आरोपींकडून 20 कोटीचं 20 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. नंतर आणखी आरोपींना अटक केली असता, याआधी 112 किलो मेफेड्रॉन ड्रग्जची विक्री झाल्याचं तपासात समोर आलं. पुण्याच्या रांजणगाव येथील संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत (Biotech Company) हे बनवलं जायचं. आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे.

आधी 20 कोटींचे मेफेड्रॉन तर आता 85 लाखांची रोकड आणि 75 लाखांची जमीन जप्त करण्यात आली आहे. औषधांच्या नावाखाली हा गोरखधंदा सुरु होता, हे आता अटकेतील आरोपींवरुन सिद्ध झालं आहे. तुषार काळेने तुरुंगात असताना याचं कटकारस्थान रचलं होतं. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्रयस्थ आरोपीने नायजेरियन आरोपीशी त्याची ओळख करुन दिली.

हा नायजेरियन त्यांच्याकडून ड्रग्ज विकत घेऊन त्याची विक्री करत असे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बॉलिवूड कनेक्शन आहे की नाही हे सिद्ध होईल. याआधी ही या नायजेरियन ने 2002 ते 2012 असा दहा वर्षे ड्रग्ज प्रकरणी तुरुंगवास भोगला आहे (Selling Mephedrone Drug).

संबंधित बातम्या :

चोराची शिरजोरी, नागपुरात पोलिसांच्याच ताब्यातील ट्रक लांबवला, सराईत चोर अखेर जेरबंद

घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *