बीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या

तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरात तीन ते चार दारुच्या बाटल्याही आढळल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.

बीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या

पुणे : मूळ बीडची असलेली 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृतदेह सिंहगड रोडवरील माणिकबाग भागात असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये (Pune Girl found Dead in flat) आढळला.

तरुणीच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा सापडल्याने तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरात तीन ते चार दारुच्या बाटल्याही आढळल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.

मयत तरुणी मूळची बीड जिल्ह्यातील असून तिचे एमबीएपर्यंत शिक्षण झालं आहे. हिंजवडीमधील एका कंपनीत ती नोकरी करत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती माणिकबाग परिसरात वनबीएचके फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. तिच्यासोबत दोन बहिणी आणि तिची आईसुद्धा राहत होती.

काही कार्यक्रमानिमित्त तरुणीचे कुटुंब बीडमधील मूळगावी गेलं होतं. मात्र तरुणी 27 नोव्हेंबरला माणिकबागेतील फ्लॅटमध्ये परत आली. तिची आई शनिवारपासून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र संपर्क होऊ न शकल्याने आई सोमवारी बीडवरुन तिच्या फ्लॅटवर आली.

खंडणी उकळल्याप्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्री अटक

फ्लॅटला कुलूप असल्याने आईला संशय आला. तिने आपल्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला, तेव्हा बेडवर संशयास्पद अवस्थेत तरुणीचा मृतदेह दिसला. तिने तत्काळ सिंहगड पोलिसांना बोलावलं.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं सिंहगड रोड (Pune Girl found Dead in flat) पोलिसांकडून सांगण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *