खंडणी उकळल्याप्रकरणी 'या' मराठी अभिनेत्री अटक

मराठी अभिनेत्री सारा श्रवणला (Marathi actrees sara shravan arrested) पोलिसांनी खंडणी उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.

खंडणी उकळल्याप्रकरणी 'या' मराठी अभिनेत्री अटक

मुंबई : मराठी अभिनेत्री सारा श्रवणला (Marathi actrees sara shravan arrested) पोलिसांनी खंडणी उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. याप्रकरणात आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. गुन्हे शाखेने साराला लोअर परळ येथून अटक (Marathi actrees sara shravan arrested) केली. या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

सारा श्रवणने नवोदीत अभिनेता सुभाष यादवसोबत ‘रोल नंबर 18’ चित्रपटात काम केले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुभाष यादव याच्यावर छेडछाड केल्याचा आरोप साराने केला होता. साराने यादवला धमकावत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची मागणी केली होती, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

“या प्रकरणात आरोपींनी सुभाषला जबरदस्ती माफी मागायला लावली आणि त्याचा व्हिडीओ चित्रीत केला. त्यानंतर आरोपींनी हा व्हिडीओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात 15 लाख रुपयांची मागणी केली. पण एका महिला अभिनेत्रीने व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे सुभाषने सहकारनगर पोलिसांत तक्रार दाखल केली”, असं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना यापूर्वीच अटक झाली होती. त्यामुळे अभिनेत्री सारा श्रवण दुबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण गुन्हे शाखेने ती जाण्यापूर्वीच तिला अटक केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे पुणे कोर्टानेही साराचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *