पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जवळपास 5 कोटी मुद्देमालासह 7 आरोपींना बेड्या

पुण्यात महामार्गावर दरोडा टाकून लुटणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय (Pune police arrest gang of dacoit on highway).

पुण्यात महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, जवळपास 5 कोटी मुद्देमालासह 7 आरोपींना बेड्या

पुणे : पुण्यात महामार्गावर दरोडा टाकून लुटणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय (Pune police arrest gang of dacoit on highway). स्थानिक गुन्हे शाखाने (एलसीबी) सिनेस्टाईल पाठलाग करुन या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी कंपनीचा सिगारेटचा कंटेनर लुटला होता. यानंतर त्याच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 4 कोटी 91 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर 7 आरोपींना अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींचा तपास सुरु आहे.

या टोळीतील सर्व आरोपी मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यातील आहेत. दिनेश झाला हा या टोळीचा म्होरक्या आहे. प्रत्येक गुन्हा करताना आरोपी मोबाईल आणि सिम कार्डचा एकदाच वापर करत होते. काम झालं कि मोबाईल आणि सिम नष्ट करुन ते पसार होत असे. सिम कार्ड वेगवेगळ्या राज्यातील असल्याने पोलिसांना ते गुंगारा देत होते. गेल्या 10 वर्षांपासून या आरोपींना अटक झाली नव्हती. मात्र, या कारवाईनंतर मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 4 कोटी 51 लाख 58 हजार 400 रुपये किमतीचे 13,600 सिगारेट बॉक्स जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 14 हजार रोख रक्कम, 6 मोबाईल, 2 ट्रक, 1 बनावट रिवॉल्व्हर, डुब्लिकेट नंबर प्लेट, एक चॉपर चाकू असा तब्बल 4 कोटी 91 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी सुपे ते मोरगाव या परिसरात सिगारेटचा कंटेनर हायजॅक केला. आरोपींनी हा सर्व माल आपल्या ट्रकमध्ये घालून धूम ठोकली होती. कंटेनर चालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून टेंभुर्णीला सोडून माल लुटला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरु केला.

पाठलागादरम्यान यातील एक ट्रक ट्रॅफिकमध्ये अडकला. यानंतर या ट्रकमधील आरोपी उड्या मारुन पळून गेले. तर दुसऱ्या ट्रकमधील आरोपी रस्त्याचा दुभाजक तोडून पळून गेले. अखेर पाठलाग करुन 7 जणांना जेरबंद करण्यात आलं. या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लूट केलीय. या टोळक्यावर आतापर्यंत 11 गुन्ह्यांची नोंद असून साधारण 33 कोटींचा माल लुटल्याचा संशय आहे.

संबंधित बातम्या :

Hindustan Petroleum | भिंतीत बोगदा खणून पाईपलाईन, ‘एचपी’ कंपनीतून हजारो लिटर डिझेल चोरी, चेंबूरमध्ये पर्दाफाश

Nagpur Crime | नागपुरात पार्किंगच्या वादातून 34 वर्षीय तरुणीची हत्या

Nagpur Crime | नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

Pune police arrest gang of dacoit on highway

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *