Nagpur Crime | नागपुरात पार्किंगच्या वादातून 34 वर्षीय तरुणीची हत्या

नंदनवन झोपडपट्टी परिसरात पार्किंगच्या वादातून आरती गिरडकरची हत्या झाल्याचा आरोप आहे. (Nagpur Crime Lady killed in fight over Parking)

Nagpur Crime | नागपुरात पार्किंगच्या वादातून 34 वर्षीय तरुणीची हत्या

नागपूर : नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्यांचं सत्र थांबताना दिसत नाही. पार्किंगच्या वादातून 34 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Nagpur Crime Lady killed in fight over Parking)

मंगळवारी रात्री झालेल्या हत्येच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच काल रात्री तरुणीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं वृत्त आलं. नंदनवन झोपडपट्टी परिसरात पार्किंगच्या वादातून आरती गिरडकरची हत्या झाल्याचा आरोप आहे.

घराजवळील पार्किंगमुळे आरती आणि आरोपी बंटी ऊर्फ एकनाथ टापरे यांच्यात मोठा वाद झाला. याच रागातून बंटीने धारदार शस्त्राने वार करुन आरतीची हत्या केल्याची माहिती आहे.

हेही वाचा :  नागपुरात जुन्या वैमनस्यातून तरुणाची हत्या, तडीपार आरोपीसह तिघांना अटक

नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली. बंटीच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरतीचा जागीच मृत्यू झाला. आरोपी बंटी टापरे याला नंदनवन पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरात 24 तासात हत्येची ही दुसरी घटना घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरी शहरात वाढत्या खुनाच्या घटना नक्कीच चिंतेची बाब आहे.

दोनच दिवसांपूर्वी नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्वॉटर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. गौरव खडतकर या तरुणाची पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची माहित आहे. सक्करदारा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून चौघांपैकी एक जण तडीपार आरोपी आहे. (Nagpur Crime Lady killed in fight over Parking)

संबंधित बातम्या :

कोरोना पॉझिटिव्ह भासवलं, क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून 21 वर्षीय तरुणीची छेडछाड

बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

(Nagpur Crime Lady killed in fight over Parking)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *