AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admission: पोरांनी 85 टक्के गुण मिळवले तरीही पदरी निराशा! तिसऱ्या यादीचा कटऑफ वाढला, विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा

यामुळे सुमारे 92 हजार 241 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेले नाहीत. आता या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष फेरीत कोट्यातील जागा खुल्या गटात वर्ग होत असल्याने या फेरीत जे विद्यार्थी शिल्लक आहेत अशांना आता संधी आहे.

11th Admission: पोरांनी 85 टक्के गुण मिळवले तरीही पदरी निराशा! तिसऱ्या यादीचा कटऑफ वाढला, विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा
11th Admission Cut OffImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 23, 2022 | 11:54 AM
Share

पहिल्या व दुसऱ्या यादीत (Merit List 11th Admission) प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलून पुन्हा नव्याने महाविद्यालयांची निवड केल्याने या यादीत चक्क दुसऱ्या यादीपेक्षा कटऑफ वाढलेले दिसत आहेत. दुसऱ्या यादीत ज्या महाविद्यालयांचे कट ऑफ 80 टक्क्यांपर्यंत आले होते त्या महाविद्यालयांचे कटऑफही (CutOff) तिसऱ्या यादीत 88 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यामुळे सुमारे 92 हजार 241 विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेले नाहीत. आता या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा (Waiting List) करावी लागणार आहे. विशेष फेरीत कोट्यातील जागा खुल्या गटात वर्ग होत असल्याने या फेरीत जे विद्यार्थी शिल्लक आहेत अशांना आता संधी आहे.

85 टक्के गुण मिळवले तरीही पदरी निराशा!

कटऑफ वाढल्याने अजूनही 65 ते 85 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आहे. अनेकवेळा पसंतीक्रम बदल करुनही एकदाही प्रवेश मिळाला नसल्याचे अनेक विद्यार्थी आहेत. या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाच्या 2 ते 10 क्रमांकामधील कोणतेही महाविद्यालय अलॉट झाले असेल व त्यांना या महाविद्यालयात प्रवेश नको असेल तर ते विशेष फेरीसाठी पात्र ठरू शकतील. मात्र ज्या विद्याथ्र्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे, त्यांना त्या आता मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. तिसन्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय अलॉट झालेले विद्याथ्र्यांनी 24 ऑगस्टला संध्याकाळी 6 पर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावेत, असे शिक्षण विभागातर्फे म्हटले आहे.

अनेक महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये उसळी

अकरावी प्रवेशाची केंद्रीयभूत प्रवेशप्रक्रियेची तिसरी नियमित फेरी सोमवारी जाहीर करण्यात आली. या यादीत मात्र अनेक महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. या फेरीसाठी 1 लाख 43 हजार 602 जागांसाठी एक लाख 43 हजार 10 अर्ज दाखल झाले होते. यापैकी 50 हजार 769 विद्यार्थ्यांना या यादीमध्ये महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे. सुमारे 13 हजार 920 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

  • एचआर महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटऑफ दुसऱ्या यादीत 92.6 टक्क्यांवर होता. मात्र तिसऱ्या यादीत कटऑफ 96.8 टक्क्यांवर पोहोचला.
  • झेवियर्सचा आर्टचा कटऑफ 93.4 टक्क्यांवरून 95.6 टक्क्यांवर आला आहे.
  • माटुंगा येथील रूईयाच्या कला शाखेचा कटऑफ 79.2 टक्क्यांवरून तिसऱ्या यादीत 92.8 वर पोहोचला आहे.
  • रूपारेलचा विज्ञान शाखेच्या कटऑफमध्येदेखील वाढ होऊन तिसऱ्या यादीतील कटऑफ 92.2 वर राहिला आहे.
  • साठ्ये महाविद्यालयाचा कला शाखेचा कटऑफ 76.8 वरून 80.6 वर पोहोचला
  • मिठीबाई महाविद्यालयाचा कटऑफही 85.2 वरून 89.2 वर गेला आहे.
  • दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये अवघ्या 24 हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेशनिश्चिती केल्यामुळे तिसऱ्या गुणवत्ता यादीतील स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुसऱ्या यादीपेक्षा या यादीत कटऑफ मोठ्या फरकाने वाढले असल्याचे प्राचार्यानी माहिती देताना सांगितले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.