11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता

यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार आहे.

11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता
11th Admission Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:00 AM

मुंबई : अकरावी प्रवेशाची (11th Admission) पहिली यादी आज बुधवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफ वाढणार की घटणार याकडे लक्ष लागले आहे. या यादीत पात्र ठरलेल्या 2 लाख 47 हजार विद्याथ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. यंदा गुणवंताची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी (11th Students) नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण (Admission) करावा लागणार आहे.

पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता

मुंबईत अकरावी प्रवेशात 1 हजार 15 महाविद्यालयांत 3 लाख ६२ हजार ७५९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज यादीसाठी अंतिम आहेत. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील जागा मिळवण्यासाठी टॉपर्स विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होते. यामुळे पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता आहे. ९५ ते १०० टक्के गुण मिळवलेल्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ३० ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरून अंतिम केले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर आयसीएसई आणि सीबीएसई विद्यार्थ्यांनाही यावर्षी ९० टक्केहून अधिक गुण आहेत. यामुळे या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता प्राचार्य व्यक्त करत आहेत.

…तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार

3 ऑगस्टच्या पहिल्या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. जर पालकांनी पसंतीक्रम देताना गुण आणि महाविद्यालयातील कटऑफ याचा ताळमेळ बसवला असल्यास पहिल्या यादीत प्रवेश मिळतील असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.