पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदाच केंद्रीय पद्धतीने प्रवेश

| Updated on: Aug 13, 2021 | 9:44 PM

विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. याची कालपासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी प्रतिसाद दिला आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; पहिल्यांदाच केंद्रीय पद्धतीने प्रवेश
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात येऊ लागल्यानंतर शैक्षणिक क्षेत्राची घडी सावरू लागली आहे. कोरोना महामारीमुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियांना सरकारकडून चालना दिली जात आहे. अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयटीआय प्रवेश प्रक्रियेचेही अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याचवेळी आता पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व शैक्षणिक विभागांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. याची कालपासून म्हणजेच 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी प्रतिसाद दिला आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे. (Announcing the schedule of admission process for postgraduate courses; Central access for the first time)

माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केली ऑनलाईन प्रवेश प्रणाली

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया राबवताना विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे, कुठल्याही अडथळ्यांविना पार पाडण्यासाठी विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने योग्य पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रणाली विकसित केली आहे. विद्यार्थी uom-admissions.mu.ac.in या संकेतस्थळावरून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अर्ज सादर करू शकत आहेत. विविध विद्याशाखा निहाय एकूण 48 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – 12 अभ्यासक्रम, मानव्यविद्याशाखा – 28 अभ्यासक्रम, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – 2 अभ्यासक्रम आणि आंतरविद्याशाखा – 6 अभ्यासक्रम अशा प्रकारे एकूण 48 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज दाखल करता येणार आहे.

काहीही अडचण आल्यास ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन

प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत असताना विद्यार्थ्यांना जर काहीही अडचण आली, तर विद्यार्थी ईमेल आयडीवर ईमेल करून आपली समस्या विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. ट्युटोरिअल आणिा तांत्रिक अडचण उद्भवल्यास संपर्क साधा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी त्याचबरोबर पेमेंट गेट-वेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार 15 सप्टेंबरपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियमित लेक्चर्सना सुरुवात होईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली आहे.

असे आहे ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक

– नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज सादर करणे : 12 ऑगस्टपासून 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत

– ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी : 26 ऑगस्टपासून 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत

– तात्पुरती गुणवत्ता यादी : 30 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता

– विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास सादर करणे : 31 ऑगस्ट

– अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबरला 6 वाजता जाहीर होणार (Announcing the schedule of admission process for postgraduate courses; Central access for the first time)

इतर बातम्या

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध; चार महिने गर्भधारणा टाळण्याचा सल्ला

जळगावच्या सराफ बाजाराला झळाळी; सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल