जळगावच्या सराफ बाजाराला झळाळी; सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल

अलीकडे सोने व चांदीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे हंगाम नसतानाही ग्राहक दोन्ही धातूंच्या खरेदीला पसंती देत आहेत. लग्नसराई नसतानाही दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. एरव्ही जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो.

जळगावच्या सराफ बाजाराला झळाळी; सोने-चांदी खरेदीकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल
सोने हॉलमार्किंग
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 9:01 PM

जळगाव : सणासुदीचा हंगाम जसजसा जवळ आला आहे, तसतसे सोन्याच्या मागणीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. लोक गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून सोने आणि चांदीच्या खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे सध्या हंगाम नसतानाही सराफ बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. सुवर्णनगरी असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात देखील सोने व चांदी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. (Jalgaon’s bullion market flooded; Growing trend of investors towards gold-silver buying)

लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली

कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने 47 हजार रुपये प्रतितोळा तर चांदी 63 हजार रुपये प्रतिकिलोच्या घरात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याने सोने व चांदीच्या विक्रीचा मारा वाढला आहे. त्यामुळे दोन्ही धातूंचे दर अस्थिर आहेत.

अलीकडे सोने व चांदीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे हंगाम नसतानाही ग्राहक दोन्ही धातूंच्या खरेदीला पसंती देत आहेत. लग्नसराई नसतानाही दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. एरव्ही जुलै-ऑगस्टचा हंगाम सराफ बाजारासाठी मंदीचा काळ असतो. पण आता दर कमी झाल्याने अनेक जण गुंतवणूक म्हणून तसेच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येणाऱ्या लग्नसराईसाठी सोने खरेदी करत आहेत. कोरोना महामारी नियंत्रणात असल्याने बाजारपेठ पुन्हा गजबजली आहे. त्यामुळे सराफ बाजारात एरवी होणाऱ्या उलढालीच्या तुलनेत 40 ते 50 टक्क्यांनी उलाढाल वाढली आहे.

देशांतर्गत बाजारातील सोने-चांदीचा डिलिव्हरी दर

देशांतर्गत बाजारात एमसीएक्सवर ऑक्टोबरमध्ये संध्याकाळी 4.25 वाजता डिलिव्हरीसाठी सोने 202 रुपयांनी वाढून 46565 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 160 रुपयांनी वाढून 46735 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होते. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 619 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 62479 रुपये, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 590 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 63198 रुपये आणि मार्च 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 600 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 63956 रुपये झाली.

2 आठवड्यांमध्ये 2 हजार रुपयांनी स्वस्त झाले सोने

2 आठवड्यांपूर्वी सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 48,390 रुपये इतका होता. दोन आठवड्यांपूर्वीबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळी सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 48,390 रुपये इतका होता आणि चांदीचा भाव 67,976 रुपये प्रति किलो होता. चांदीचा भाव 6000 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. तसेच MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीने सुमारे 56,200 रुपयांची उच्च पातळी गाठली होती. त्यानुसार विक्रमी पातळीवरून सोने 9,724 रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Jalgaon’s bullion market flooded; Growing trend of investors towards gold-silver buying)

इतर बातम्या

ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक; मुख्यमंत्र्यांकडून मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण

मोठी बातमी ! औरंगाबादेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात विषबाधा, गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.