कॅन्सरने खूप छळलं, वडिलांना हिरावलं, नंतर मुलीलाही घेरलं, पण बदलापूरच्या रियाने आजाराला गाडलं, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी कहाणी

देशावर सध्या कोरोनाचं सावट आहे. या कोरानाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला. हे संकट सुरु असतानाच बदलापुरत एक कुटुंब दोन वर्षांपासून कॅन्सरपासून झुंज देत होतं.

कॅन्सरने खूप छळलं, वडिलांना हिरावलं, नंतर मुलीलाही घेरलं, पण बदलापूरच्या रियाने आजाराला गाडलं, डोळ्यांमध्ये पाणी आणणारी कहाणी
आजाराने वडिलांचा जीव घेतला, मुलीलाही निदान, बदलापूरच्या रियाने केमोथेरपी-रेडिएशन सोसत कॅन्सरला गाडलं
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 8:28 PM

बदलापूर (ठाणे) : देशावर सध्या कोरोनाचं सावट आहे. या कोरानाने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला. हे संकट सुरु असतानाच बदलापुरत एक कुटुंब दोन वर्षांपासून कॅन्सरपासून झुंज देत होतं. कॅन्सरने सर्वात आधी कुटुंबप्रमुखाला घेरलं. त्यात त्यांचा जीवही घेतला. त्यानंतर त्यांच्या मुलीला ग्रासलं. पण अवघ्या 13 वर्षाच्या मुलीने कॅन्सरशी दोन हात देत झुंज दिली. विशेष म्हणजे तिने कॅन्सरला तर गाढलंच त्यासोबत दहावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवले.

बदलापूरच्या रिया भुतकर या विद्यार्थिनीनं कॅन्सरवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. दहावीचं वर्ष असताना जवळपास 6 ते 8 महिने रियावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. मात्र त्यातून जिद्दीने बरी होऊन रियाने दहावीचा अभ्यास केला आणि त्यात चांगलं यशही मिळवलं.

आधी वडिलांना शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान

बदलापूर पूर्वेच्या आपटेवाडी परिसरात राहणारी रिया भुतकर ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. बदलापूरच्या कार्मेल शाळेत शिकणाऱ्या रियाचे वडील रिक्षाचालक होते. तर आई खासगी कंपनीत नोकरी करते. 2019 सालच्या अखेरीस रियाचे वडील मनोज भुतकर यांना शेवटच्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं. आई शिल्पा नोकरी करत असल्यानं रियानं वडिलांची काळजी घेतली. मात्र महिनाभरातच रियाच्या वडिलांचं निधन झालं.

रियाला 9 वीचे शेवटचे दोन पेपर देता आले नाहीत

वडिलांच्या निधनामुळे रियाला 9 वीचे शेवटचे दोन पेपर देता आले नाहीत. मात्र सरासरी मार्कांवर ती ती दहावीत गेली. पतीच्या निधनाचा धक्का पचवत नाही, तोच रियाची आई शिल्पा भुतकर यांना आणखी एक मोठा धक्का बसला. कारण काही महिन्यातच रियाला सुद्धा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं. त्यामुळे शिल्पा यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

रियाची कॅन्सरवर मात, दहावीत भरघोस गुणांनी यशस्वी

स्थानिक डॉक्टर आणि कौटुंबिक मित्र मंगेश असरोंडकर यांच्या मदतीने रियाला मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. यानंतर दोन केमोथेरपी आणि 33 रेडिएशनचे वेदनादायी सेशन रियावर करण्यात आले. या उपचारांच्या दरम्यानही आपल्याला दहावीची परीक्षा देता येईल की नाही? अशा विवंचनेत रिया होती. त्यातून नोव्हेंबर 2020 मध्ये रिया पूर्णपणे बरी झाली आणि त्यानंतर तिने पूर्णपणे अभ्यासाला लागत दहावीची ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेत 65 टक्के गुण मिळवत रिया पास झाली. या आनंदाने भुतकर कुटुंब गेल्या दोन वर्षातलं दुःख विसरुन गेलं.

रियाची प्रतिक्रिया

रियाला आता आर्ट्स घेऊन सायकॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. अभ्यासासोबतच रियाला चित्रकलेचीही आवड आहे. तिच्या घरी तिनं रेखाटलेली चित्र पाहिल्यानंतर तिच्या कलेची प्रचिती येते. मला जेव्हा कॅन्सर झाला, तेव्हा मी या गोष्टीचा फारसा विचारच केला नाही. फक्त आपल्याला यातून निघायचं आहे आणि उपचार घ्यायचे आहेत, इतकंच डोक्यात होतं, असं रिया सांगते. तर आईला सुद्धा आपणच धीर दिला आणि अखेर आपण कॅन्सरवर मात केली, असं रियाने सांगितलं.

रियाच्या कुटुंबाला सोसायटीच्या रहिवाशांची खंबीर साथ

या कठीण काळात रियाच्या कुटुंबाला तिच्या सोसायटीतले लोक, तिच्या आईच्या ऑफिसमधले सहकारी आणि कौतुकबिक मित्र मंगेश असरोंडकर यांनी खंबीर साथ दिली. रिया ही लहानपणीपासून आपल्या अंगाखांद्यावर खेळली, त्यामुळं वडिलांच्या अकाली निधनानंतर तिलाही कॅन्सर आपल्यासाठी धक्का होता, मात्र रियाने तीच्या जिद्दीने या सगळ्या परिस्थितीवर मात केली, असं मंगेश असरोंडकर सांगतात.

आधी वडिलांचं निधन, मग स्वतः कॅन्सरवर घेतलेले वेदनादायी उपचार आणि या सगळ्यातून रियाने मिळवलेलं हे यश खरोखरच इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावं लागेल. तुमच्या मनात एखाद्या संकटावर मात करण्याची जिद्द असेल, तर कोणतंही संकट मोठं नसतं, हेच यातून अधोरेखित झालंय.

हेही वाचा : एक पराभव आणि सगळं संपलं? वाचा पैलवान विनेश फोगट नेमकी काय म्हणतेय?

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.