मोठी बातमी ! औरंगाबादेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात विषबाधा, गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली

औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे.

मोठी बातमी ! औरंगाबादेत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात विषबाधा, गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 8:26 PM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गावातील जवळपास 70 टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. (seventy percent people have been food poisoned in turkabad kharadi village in aurangabad district )

विषाबाधेचं कारण अस्पष्ट, गावातील 70 टक्के लोकांना विषबाधा 

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, याच भंडाऱ्याच्या जेवणातून ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. विषबाधा होण्याचं कारण काय असावं ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या विषबाधेत गावातील शेकडो लोकांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या विषबाधेमुळे गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली आहे.

बाधित लोकांवर गावातच उपचार

हा प्रकार माहिती होताच येथील आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्य विभागाचे पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी  तुर्काबाद खराडी गावाकडे धाव घेतली. आरोग्य विभागातील पथकाकडून गावातच बाधित लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या प्रकृती बिघडलेल्या नागरिकांवर उपचार करणे सुरु आहे.

इतर बातम्या :

औरंगाबादेत युवासेनेच्या संवाद मेळाव्यात तुफान गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई होणार ?

पवार-फर्नांडीस ते लुंगीवाला, फटकारणाऱ्या ‘मार्मिक’चा जन्म कसा झाला? मुख्यमंत्र्यांनी मोकळं करुन सांगितलं

तो पत्नीवर भडकला, कपाट उघडलं, रिव्हॉल्व्हर काढली आणि पत्नीवर रोखली, कारण…

(seventy percent people have been food poisoned in turkabad kharadi village in aurangabad district )

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....