दहावीनंतर करा ‘हे’ कोर्सेस, चांगले पॅकेज मिळेल, जाणून घ्या

Career options after 10th: अनेकदा घरातील जबाबदाऱ्या तुम्हाला लहान वयातच काम करण्यास भाग पाडतात. कधी कधी मुलं स्वत:च भविष्याबद्दल इतकी गंभीर असतात की दहावी पास होताच करिअरचे पर्याय शोधू लागतात. तुम्हालाही कमी वयात कमाईचा मार्ग बनवायचा असेल तर दहावीबोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. चला जाणून घेऊया.

दहावीनंतर करा हे कोर्सेस, चांगले पॅकेज मिळेल, जाणून घ्या
दहावी बोर्ड
| Edited By: | Updated on: May 15, 2025 | 5:52 PM

Career options after 10th: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही महिन्यांचा मोकळा वेळ मिळतो. त्यांची इच्छा असेल तर ते या कालावधीत शॉर्ट टर्म कोर्स करू शकतात. यामुळे त्यांना अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यास मदत होईलच, शिवाय उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास देखील मदत होईल.

दहावीनंतरचा प्रत्येक निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा. करिअरचा पाया इथूनच घातला जातो. दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी ही त्यांची निवड आणि भवितव्य लक्षात घेऊन विषयांची निवड करावी. साधारणपणे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य यापैकी एका शाखेची निवड करतात.

दहावीनंतर तुम्ही काय करू शकतो?

दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात. आपण आपल्या वरिष्ठांशी, शिक्षकांशी, पालकांशी किंवा करिअर तज्ञांशी बोलून यापैकी कोणतीही निवड करू शकता-

  • 1- विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेचा 1- 12 वी अभ्यास
  • 2- आयटीआय कोर्स
  • 3- पॉलिटेक्निक कोर्स
  • 4- डिप्लोमा कोर्स
  • 5- पॅरामेडिकल कोर्स
  • 6- शॉर्ट टर्म कोर्स

दहावीबोर्डाच्या परीक्षेनंतर व्होकेशनल कोर्सेसमध्येही प्रवेश घेता येतो. व्होकेशनल कोर्सेसमध्ये जॉब फोकस्ड अभ्यासक्रम तयार केला जातो.

व्होकेशनल कोर्सेस

  • 1- इंटिरिअर डिझायनिंग कोर्स
  • 2- फायर अँड सेफ्टी
  • 3- सायबर लॉ
  • 4- ज्वेलरी डिझायनिंग कोर्स
  • 5- फॅशन डिझायनिंग कोर्स हे व्होकेशनल कोर्स करू शकता

दहावी पास होताच नोकरी करायची असेल तर खाली नमूद केलेल्या कोणत्याही कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकता, जाणून घेऊया.

दहावीनंतर करिअर कुठे करायचे?

1) IIT- दहावीनंतर पटकन नोकरी शोधण्यासाठी IIT हा उत्तम पर्याय आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, कॉम्प्युटर अशा अभ्यासक्रमांचा ठळकपणे समावेश आहे. त्यांचा कालावधी 6 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत असतो.

2) कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग: हे संगणकाचे युग आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्सेसमध्ये कॉम्प्युटर रिपेअरिंग, हार्डवेअर आणि नेटवर्किंग इ. विषयी शिकवले जाते.

3) अभियांत्रिकी पदविका: या अभ्यासक्रमाला पॉलिटेक्निक डिप्लोमा असेही म्हणतात. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. डिप्लोमा मिळाल्यानंतर तुम्ही नोकरीसाठीही अर्ज करू शकता. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, केमिकल, मेकॅनिकल, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असे विषय शिकवले जातात.

4) नॉन इंजिनीअरिंग डिप्लोमा: दहावीनंतर नॉन टेक्निकल डिप्लोमाचाही पर्याय आहे. हा पदविका देखील 3 वर्षांचा आहे. यामध्ये फॅशन डिझायनिंग, कमर्शियल आर्ट, टेक्सटाइल असे विषय शिकवले जातात.

5) हॉटेल मॅनेजमेंट: दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स करता येतो. या उद्योगात भविष्यात चांगल्या संधी आहेत.

दहावीनंतर सरकारी नोकरी मिळेल का?

दहावीनंतर सरकारी नोकरीचा पर्यायही दहावीनंतर आहे. 10 वी नंतर भारतीय लष्कर, रेल्वे, बीएसएफ इत्यादींमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. सरकारी नोकऱ्यांमधील भरतीची माहिती वृत्तपत्रे व संकेतस्थळांवरील जाहिरातींच्या माध्यमातून उपलब्ध आहे.