AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Board Exam Time Table 2024 : इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण टाइम टेबल

CBSE Board Exam 10th, 12th Date Sheet 2024 : देभरातील सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विद्यार्थ्यांनाही आता आपल्या अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे. दोन महिन्यानंतर या परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना बराच वेळ मिळाला आहे.

CBSE Board Exam Time Table 2024 : इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; वाचा संपूर्ण टाइम टेबल
CBSE Date Sheet Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2023 | 6:45 PM
Share

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबईएसई)च्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने डेट शीट जारी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाची सेकेंड्री आणि सीनियर सेकेंड्रीची वार्षिक परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. ही परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. बोर्डाने अखेर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तारखा पाहून विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना cbse.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच वेळापत्रक डाऊनलोडही करता येणार आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीसाठी 1 जानेवारी 2024 पासून प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे.

है तयार हम

2024मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षेची पूर्ण तयारी केली आहे. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनाही आपल्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यांनी आजपासूनच हे नियोजन सुरू केलं आहे.

डेटशीट कशी डाऊनलोड कराल? पाच स्टेप्स

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेची डेटशीट जारी करण्यात आली आहे. केवल पाच स्टेप्सद्वारे ही स्टेप्सशीट डाऊनलोड करता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

1. सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024ची डेटशीट डाऊनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in किंवा cbse.nic.in वर जावे लागेल. 2. त्यानंतर latest@CBSE section वर क्लि करा 3. त्यानंतर सीबीएसई इयत्ता 10वी आणि 12वीच्या डेटशीटसाठी लेटेस्ट अपडेट लिंकवर क्लिक करा 4. त्यानंतर तुमच्या क्लासच्या लिंकवर क्लिक करा 5. त्यानंतर बोर्ड परीक्षेच्या डेटशीट पीडीएफ लिंकवर क्लिक करून तिला डाऊनलोड करा

गाईडलाईन काय?

दोन विषयाच्यामध्ये पुरेसा गॅप असावा

इयत्ता 12वीची डेटशीट बनवताना JEE Main च्या परीक्षेवर लक्ष ठेवलं पाहिजे

अभ्यासाचं वेळापत्रक बनवताना दोन विषय एकाच विषयी येणार नाही, याची काळजी घ्या

परीक्षा सकाळी 10.30 वाजता असेल

डेटशीट दोन महिने आधीच जारी केलं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पुरेपूर तयारी करावी म्हणून.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.