CBSE Class 11 Admission:सीबीएसईनं नियम बदलला, अकरावी प्रवेशाबाबत मोठा निर्णय

सीबीएसईनं अकरावीला गणित विषयाची निवड करण्याविषयीच्या नियमामधून सूट दिली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:11 PM, 3 May 2021
CBSE Class 11 Admission:सीबीएसईनं नियम बदलला, अकरावी प्रवेशाबाबत मोठा निर्णय
सीबीएसई

नवी दिल्ली : कोरोना माहामारीमुळे राज्यासह देशातील काही परीक्षा लांबणीवर पडल्या. तर कही परीक्षा थेट रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सीबीएसईनं अकरावीला गणित विषयाची निवड करण्याविषयीच्या नियमामधून सूट दिली आहे. ही सूट केवळ यावर्षीच लागू असेल. (CBSE Class 11 Admission class 10 pass Students who choose Basic math in 10th will choose Math as main subject for this year only)

दहावीला बेसिक मॅथ्स निवडणाऱ्यांना संधी

सीबीएसईनं दहावीला बेसिक मॅथ्स विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीला मॅथ्स शिकण्याची संधी मिळेल, असं म्हटलं आहे. सीबीएसईच्या निर्णयामुळे दहावीला स्टँडर्ड मॅथ्स या विषयाची निवड केली नसली तरी अकरावीला मॅथ्स विषयाची निवड करता येणार आहे. अंतर्गत मूल्यमापन होणार असल्यानं उत्तरपत्रिका पूनर्मूल्यांकन, फोटोकॉपी विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

2019 चा नियम काय?

सीबीएसईनं 2019 मध्ये एक नियम लागू केला होता. त्यानियमाप्रमाणं दहावीला ज्या विद्यार्थ्यांनी स्टँडर्ड गणित विषयाची निवड केली असेल. त्या विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीला मॅथ्स विषय निवडता येत होता. ज्यांना स्टँडर्ड गणित नकोय ते बेसिक गणित विषयाची निवड करत असतं. दहावीनंतर एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्स विषय निवडायचा असल्यास त्यांना 10 वीची कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागत असे.

कोरोना विषाणू संसर्गामुळं नियमात सूट

सीबीएसईनं विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी व्हावा म्हणून बेसिक गणित आणि स्टँडर्ड गणित असे पर्याय ठेवले होते. स्टँडर्ड गणित असणाऱ्यांना अकरावी आणि बारावीला गणित विषयाची निवड करता येत होती. बेसिक गणित विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणं मॅथ्स शिकायचा असल्यास परीक्षा देण्याचा नियम आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी सूट देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

ICSI CSEET Admit Card 2021 : आयसीएसआय सीएसईईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून करा डाउनलोड

बारावीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज शक्य, राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

(CBSE Class 11 Admission class 10 pass Students who choose Basic math in 10th will choose Math as main subject for this year only)