CBSE Syllabus: सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून नेमकं काय वगळलं? नवीन अभ्यासक्रम वेबसाईटवर अपलोड

या सत्रासाठी सीबीएसईने नवीन अभ्यासक्रम वेबसाइटवर अपलोड केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने या शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत.

CBSE Syllabus: सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून नेमकं काय वगळलं? नवीन अभ्यासक्रम वेबसाईटवर अपलोड
CBSE 10th Result 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 11:46 AM

नवी दिल्ली: कोरोना (Corona)आटोक्यात आल्यानंतर शाळा कॉलेजेस नियमित सुरु झाले. शाळा सुद्धा कोरोना काळात तयार केलेल्या नियमांमध्ये दुरुस्ती करू लागली. कोरोना काळात सीबीएसईने  दोन टर्मची योजना आणली. काही दिवसापूर्वी सीबीएसईने ती योजना रद्द करून पुन्हा एक टर्म योजना आणली ज्यात बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आता फक्त एकदाच परीक्षा द्यावी लागणार आहे. ही घोषणा केल्यानंतर सीबीएसईने अभ्यासक्रम (CBSE Syllabus)देखील घोषित केला होता. या सत्रासाठी सीबीएसईने नवीन अभ्यासक्रम वेबसाइटवर अपलोड केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE ने या शैक्षणिक सत्रातील अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. हा अभ्यासक्रम त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर (Official Website)उपलब्ध आहे. या 2022-23 च्या नवीन घोषित केलेल्या 11वी 12वी च्या अभ्यासक्रमातून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने इतिहास आणि राज्यशास्त्र विषयांतील काही धडे वगळले आहेत. अलिप्ततावादी चळवळ, औद्योगिक क्रांती, शीतयुद्धाचा काळ, मुघल राजवटीचा इतिहास, आफ्रिका आशिया खंडामध्ये इस्लामी राजवटीचा उदय या विषयांवरील धडे याचबरोबर उर्दू कवी फैज अहमद फैज यांच्या दोन अनुवादित कविता या गोष्टी वगळल्या आहेत.

काय काय वगळलं आहे अभ्यासक्रमातून

  1. सीबीएसईने ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार, दहावीच्या पुस्कातील एका प्रकरणातील जात, धर्म आणि लिंग या विषयात उदाहरण म्हणून दिलेली फैज अहमद फैज यांची कविताही काढून टाकण्यात आलीये.
  2. चालू वर्षी 2022-23 च्या इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत काही विषयांच्या अभ्यासक्रमातून धडे काढून टाकण्यात आले आहेत.
  3. 11वीतील इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय आणि बारावीच्या पुस्तकातून मुघल साम्राज्य हे धडे काढून टाकण्यात आले आहेत.
  4. जागतिक इतिहास या 11 वी च्या पुस्तकातून सेंट्रल इस्लामिक लँडच्या धड्यात .विद्यार्थ्यांना इस्लामचा उदय आणि विकास तसेच सातव्या ते बाराव्या शतकापर्यंत इस्लामच्या प्रसाराविषयी माहिती देण्यात आली होती. हा धडा काढून टाकण्यात आला आहे
  5. हे सुद्धा वाचा
  6. इयत्ता 9वी मधील कविता विभागातून चंद्रकात देवतळे यांनी लिहलेला काही मजकूर काढून टाकण्यात आला आहे.
  7. त्याचप्रमाणे बारावीच्या इतिहासातील नऊ नंबरच्या प्रकरणातून मुघल साम्राज्य काढून टाकण्यात आलंय.
  8. बारावीच्या वर्गातून हिंदीतील मीठाचा मजकूर काढून टाकला आहे
  9. भारत-पाक फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूला विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनामुळे लोकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या काही हृदयस्पर्शी कथा यामध्ये आहेत. त्याही वगळण्यात आल्यात.
  10. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीची कारणे आणि परिणाम, साम्राज्यवादाचा प्रचार कसा झाला, याचा समावेश असणाऱ्या बारावीच्या पुस्तकातील पाषाणयुगातील मानवाचा पृथ्वीवरील उदय आणि विकास तसेच औद्योगिक क्रांती हे विषयही अभ्यासक्रमातून वगळले आहेत.
  11. ही शिक्षण मंडळाची बदलेली प्रणाली आहे. एकाच वेळी संपूर्ण देशात हा अभ्यासक्रम लागू करण्यात आलाय. नवीन शैक्षणिक सत्रापासून हे धडे शिकवले जाणार नाहीत असं शिक्षण मंडळाने स्पष्ट केलंय. CBSC शिक्षण मंडळाने
  12. दहावीतील सर्वेश्वर दयाळ सक्सेना यांचा मानवी करुणेचा दैवी चमक, पंचम जॉर्जचे नाक, ऋतुराज यांचा कन्यादान असे धडेही काढण्यात आले आहेत.
  13. 11 वी मधील सेंट्रल इस्लामिक भूमी आणि मुघल साम्राज्याचा मजकूर काढून टाकण्यात आलाय. रोमन साम्राज्य हटवले गेलेले नाही. याशिवाय इतर काही मजकूरही काढून टाकण्यात आला आहे
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.